सोलापूर – हॉटेल समोरून एक एचएफ मोटरसायकल चोरीला गेल्याची घटना येथील सिद्धेश्वर मार्केट यार्ड मध्ये ३० मे रोजी रात्री अकरा वाजेच्या सुमारास घडली .
याबाबत तौफिक सादिक जमादार ( रा. १५३, सिध्देश्वर नगर ४, सोलापूर ) यांनी फिर्याद दिली आहे .
यातील फिर्यादीने त्याच्या मालकीची मोटार सायकल (क्रं. एम एच १३ डी एफ ४७६५ ) ही ३० मे रोजी रात्रीअकरा वाजेच्या दरम्यान मार्केट यार्ड मधील हाजीसाब बिर्याणी येथे पार्क केली असता कोणीतरी अज्ञात चोरट्याने फिर्यादीची नजर चुकवून केवळ पंधरा मिनिटाच्या दरम्यान चोरुन नेल्याचे फिर्यादीत म्हटले आहे . हवालदार बाबर हे पुढील तपास करीत आहेत .
Post Views: 5