टेंभुर्णी – शहरातील एसटी बसस्थानकासमोर सोलापूर-पुणे मार्गावर बल्करने एसटी बसला जोरदार धडक दिल्याची घटना सोमवार, दि. २९ सप्टेंबर रोजी सकाळी सव्वाआठच्या सुमारास घडली. या अपघातात एसटीमधील १८ प्रवासी बचावले असून, वाहकासह काही प्रवाशांना किरकोळ दुखापत झाली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हरी विक्रम गुळेवाड (वय ४०, चालक, रा. टिळेकी, ता. लोहा, जि. नांदेड, सध्या रा. अलीपूर रोड, माऊली चौक, बार्शी) हे एसटी बस चालवत होते. सोलापूरहून पुण्याच्या दिशेने जाणारी टाटा कंपनीची एसटी बस (एमएच १४ बीटी ४७२२) टेंभुर्णी एसटी बसस्थानकासमोरून जात असताना समोरून/बाजूने येणाऱ्या टाटा कंपनीच्या बल्कर (एमएच ४३ वाय ४६१९) ने एसटी बसच्या डाव्या बाजूस जोरदार धडक दिली.
या धडकेत एसटी बसचे नुकसान झाले. तसेच खिडक्यांच्या काचा फुटल्या असून, बसचे अंदाजे ७० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.यामध्ये एसटी बसचे वाहक संतोष शिवाजी माळी तसेच प्रवासी भाऊ पंढरी शिंदे (रा. निमगाव, ता. माढा) आणि दत्ता विठ्ठल आहोळ (रा. नालगाव, ता. परंडा, जि. धाराशिव) यांना किरकोळ दुखापत झाली. बसमधील अन्य प्रवासी सुदैवाने बचावले.
बल्कर चालक आप्पासाहेब विष्णू नाईक (रा. नागन्नाथ गल्ली, देगाव (वाळूज), पोस्ट मानेगाव, ता. मोहोळ, जि. सोलापूर) यांनी वाहन वेगात व हयगयीने चालवून अपघातास कारणीभूत ठरलेल्या बल्कर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
घटनेचा पुढील तपास पोहेकॉ/११८६ जगताप करीत आहेत.
Post Views: 8