सोलापूर : विधानपरिषदेची निवडणूक ही केवळ राजकीय पक्षांची नव्हे, तर लोकशाही मूल्ये, विचार आणि जिल्ह्याच्या विकासाची लढाई आहे. आम्ही सर्व पक्षांच्या मतदारांपर्यंत पोहोचून विकास आणि जिल्ह्याच्या अस्मितेच्या मुद्द्यावर मत मागत आहोत. कोणत्याही सत्तेच्या जोरावर नव्हे, तर मतदारांच्या ताकदीवर ही निवडणूक लढवत असून जनतेची आणि एका अदृश्य शक्तीची साथ आमच्या पाठीशी असल्याचा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केला.
विधान परिषदेच्या निवडणुकीच्या निमित्ताने आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. विधानपरिषदेचे उमेदवार वसंत देशमुख यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष महेश गादेकर व काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन नरोटे यावेळी उपस्थित होते.
खासदार मोहिते-पाटील म्हणाले, सोलापूरचे राजकारण है आजपर्यंत विकास व विचारावर आधारलेले आहे. सध्या सत्ताधार्याकडून विकासाच्या मुद्द्यावर काहीही बोलल जात नाही. जयकुमार गोरे हे पालकमंत्री आहेत का पोष्टमन आहेत. हे त्यांनी एकदा जाहीर करावे. ६०० अदृश्य मतदार आमच्या सोबत आहेत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे यापूर्वीच त्यांचे आभारही मानले आहे. हे जिल्ह्याला माहिती आहे. ही निवडणुक स्थानिक सुराज्य मतदारसंघाची आहे. त्यामुळे, स्थानिक प्रभागासह गावपातळीवरील विकासावरच विरोधकांनीह बोलावे मात्र ते टाळले जाते. अकलुज हे विचारवंतांचे गाव आहे. येथे प्रत्येकाच नेहमीच स्वागत केल जाते, मोठी मतदारसंख्या असूनही विरोधक का घाबरतात. विरोधकांचा त्यांच्या मतदारांवर विश्वास राहिला नाही. हेच यातून सिद्ध होत आहे. प्रत्येक मतदाराला भेटून आम्ही निवडणुक का लढवतो हे पटवून देतो. निवडणुका कोणतीही असो मोहिते-पाटील उमेदवार नसले तरीही मोहिते-पाटीलांवर आरोप केला जातो. या जिल्ह्यातील जनतेने मोहिते-पाटीलांना उभे केल्याचे यावेळी धैर्यशील मोहिते पाटील यांनी नमूद केले.
जे संपलेले आहेत. त्यांच्याविषयी बोलणे योग्य होणार नाही, असेही एकाच्या प्रश्नाच्या उत्तरात खा. मोहिते-पाटील यांनी स्पष्ट केले.
Post Views: 32