सोलापूर – शहर हद्दवाढ भागातील विजापूर रोड, जुळे सोलापूर, होटगी रोड या भागामध्ये नव्याने स्थापन करण्यात आलेले मध्यवर्ती महात्मा बसवेश्वर जयंती उत्सव समितीची बैठक निमित्त सवेरा नगर येथील बसव भवन या कार्यालयात मध्यवर्ती महामंडळाचे संस्थापक ट्रस्टी तथा माजी परिवहन सभापती विजयकुमार हत्तुरे व समाजसेवक महामंडळाचे ट्रस्टी अध्यक्ष चनबसप्पा गुरुभेटटी यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या बैठकीत उत्सव समिती अध्यक्षपदी बसवराज दिंडोरे यांची निवड करण्यात आली.
उत्सव समितीच्या वतीने यावर्षी विविध उपक्रम राबवण्याचा संकल्प करण्यात आला आहे. 18 एप्रिल रोजी सवेरा नगर विजापूर रोड येथे महात्मा बसवेश्वर यांची प्रतिष्ठापना करण्यात येणार आहे. 19 एप्रिल रोजी दुपारी 4 ते 7 वाजेपर्यंत महाप्रसादाचे आयोजन करण्यात येणार आहे तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सत्कार व बसव संगीत या कन्नड, मराठी, हिंदी भाषेमध्ये भक्ती गीताचे कार्यक्रम संध्याकाळी 7 ते 10 वाजता ठेवण्यात आले आहे. उत्सव समितीचे उपाध्यक्ष मल्लिकार्जुन मनुरे ,सचिव जगदीश कुलकर्णी,खजिनदार मंजुनाथ चिंचोळे आदी पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली .
यावेळी महामंडळाचे ट्रस्टी तथा मिरवणूक प्रमुख सकलेश बाबुळगावकर,उद्योगपती रेवणसिद्ध बिज्जरगी,नामदेव फुलारी,सिद्धेश्वर र्कोरे, सिद्धाराम गुरुभट्टी, गणेश धोकटे, नागेश पडनुरे रुद्रप्पा कांबळे,सिद्धाराम पॅडशिंगे, पप्पू पाटील,सिद्धाराम कटारे, मंजुनाथ भतकुणकी, दिनेश बनसोडे,प्रशांत शिंदे,वीरेश स्वामी, शितल राठोड,भीमाशंकर बिराजदार,वीरुपक्ष पटणे आदी मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते.























