Thursday, May 21, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

शहर गुन्हे शाखे कडून चार सराईत आंतरजिल्हा चोरट्यांना अटक

तरुण भारतbyतरुण भारत
May 21, 2026
in crime
0
शहर गुन्हे शाखे कडून चार सराईत आंतरजिल्हा चोरट्यांना अटक
0
SHARES
2
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
सोलापूर : शहर गुन्हे शाखेच्या पोलीस पथकाने  ४ सराईत आंतरजिल्हा चोरट्यांना अटक करून सोलापूर शहरातील दोन घरफोडीचे गुन्हे व खडकीस आणले आहेत .या चोरट्यांकडून  सोन्याचे दागिने, रोख रक्कम
 आणि गुन्ह्यात वापरलेली कार असा एकूण ५ लाख रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे . घरफोडीचे दोन गुन्हे उघडकीस आणले आहेत.
       दीपक बाळू ढेरंगे (वय ३४, रा. कोरेगाव भिमा, जि. पुणे), दत्ता अरुण कदम (वय ३८, रा. नऱ्हे, ता. हवेली, जि. पुणे), आकाश सूर्यकांत आंग्रे (वय २९, रा. बिबवेवाडी, पुणे), साहेबराव लक्ष्मण बेंडूरे (वय ५३, रा. दहिसर वेस्ट, मुंबई) असे अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.
       या अटक करण्यात आलेल्या आरोपींपैकी दीपक ढेरंगे याच्यावर मारामारी, खुनाचा प्रयत्न, दरोडा, आणि बेकायदेशीर शस्त्र बाळगल्या प्रकारचे अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. तर दत्ता कदम याच्यावर फसवणूक, खंडणीसारखे गुन्हे दाखल आहेत. या दोघांवर यापूर्वी अहिल्यानगर आणि पुणे शहर पोलिसांनी ‘मकोका’ अंतर्गत कारवाई देखील केलेली आहे.
        सोलापूर शहरातील न्यू बुधवार पेठ भागात  दि. ४ मे रात्री ते ५ मे च्या दरम्यान  एकाच रात्री फकीरा चौक येथील दोन बंद घरांचे कडी-कोयंडा उचकटून आणि कुलूप तोडून चोरी झाल्याचा गुन्हा दाखल झाला होता. या दोन्ही घटनांचे गांभीर्य ओळखून गुन्हे शाखेचे शहर गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद माने, सपोनि शैलेश खेडकर, सपोनि जे. व्ही. गळवे व त्यांच्या पथकाने घटनास्थळाला भेट देऊन सी.सी.टी.व्ही फुटेज आणि मिळालेल्या तांत्रिक माहितीच्या आधारे आरोपींची माहिती काढली. या माहितीच्या आधारे सपोनि शैलेश खेडकर व पथकाने थेट पुणे शहरात जाऊन सापळा रचला आणि ४ सराईत आरोपींना ताब्यात घेतले. यात दीपक ढेरंगे, दत्ता कदम, आकाश आंग्रे, साहेबराव बेंडूरे यांना अटक केली. त्यांना पोलिसी खाक्या दाखवताच आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली. पोलिसांनी आरोपींकडून १५ हजार रोख, ३० हजारांचे सोन्याचे दागिने आणि गुन्ह्यात वापरलेली कार असा एकूण ४ लाख ९५ हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
       सदरची कामगिरी शहर गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद माने, सपोनि शैलेश खेडकर, सपोनि जे. व्ही. गळवे तसेच पोलीस अंमलदार संदीप जावळे, विनोद राजपूत, इम्रान जमादार, उमेश पवार, दीपक जाधव, मंजुनाथ मुत्तनवार, राजेश मोरे, अजय गुंड, बाळासाहेब काळे, सतीश काटे, प्रकाश गायकवाड, मच्छिंद्र राठोड व रतिकांत राजमाने यांनी पार पाडली .
Post Views: 10
Previous Post

स्वाती चिटणीस, दिलीप प्रभावळकर यांना जीवनगौरव #viral #solapurnews #maharashtranews

Next Post

जुळे सोलापुरात विजेच्या खांबावर काम करताना शॉक बसून ३१ वर्षीय वायरमनचा मृत्यू 

तरुण भारत

तरुण भारत

Next Post
जुळे सोलापुरात विजेच्या खांबावर काम करताना शॉक बसून ३१ वर्षीय वायरमनचा मृत्यू 

जुळे सोलापुरात विजेच्या खांबावर काम करताना शॉक बसून ३१ वर्षीय वायरमनचा मृत्यू 

ताज्या बातम्या

भाजप युवा मोर्चा बार्शी शहराध्यक्षपदी अमोल डिसले 

भाजप युवा मोर्चा बार्शी शहराध्यक्षपदी अमोल डिसले 

May 21, 2026

विडी कामगारांना किमान वेतन द्या; अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा

May 21, 2026
बार्शीतील पिंपळवाडीत राष्ट्रीय महामार्गावर वारंवार अपघात; ग्रामस्थांचा रास्ता रोको आंदोलन

बार्शीतील पिंपळवाडीत राष्ट्रीय महामार्गावर वारंवार अपघात; ग्रामस्थांचा रास्ता रोको आंदोलन

May 21, 2026
देशव्यापी फार्मसी बंदला बार्शी तालुक्यात उत्स्फूर्त प्रतिसाद

देशव्यापी फार्मसी बंदला बार्शी तालुक्यात उत्स्फूर्त प्रतिसाद

May 21, 2026
सांगोला विद्यामंदिरमध्ये ११ वी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेला गती

सांगोला विद्यामंदिरमध्ये ११ वी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेला गती

May 21, 2026
औषध विक्रेत्यांचा सोलापुरात मूक मोर्चा 

औषध विक्रेत्यांचा सोलापुरात मूक मोर्चा 

May 21, 2026

भोयरे येथील कारखान्यातून १०.६९ लाखांच्या सोलर केबलची चोरी

May 21, 2026
बार्शी तालुका पोलिसांची हातभट्टी दारु वाहतुकीवर धडक कारवाई

बार्शी तालुका पोलिसांची हातभट्टी दारु वाहतुकीवर धडक कारवाई

May 21, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

आयटी पार्कसाठी २० हेक्टर जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर : आयटी पार्कसाठी होटगी येथील गट नंबर ५७६ मधील २० हेक्टर (५० एकर) जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश...

राहुल गांधींच्या प्रतिमेला ‘जोडे मारो’ आंदोलन

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर - देशाचे तंत्रवैभव जगासमोर मांडणाऱ्या 'इंडिया एआय इम्पॅक्ट समिट'मध्ये युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या गोंधळाचे पडसाद आता सोलापुरात उमटू लागले...

राष्ट्रवादी प्रदेश सचिव पदी अॅंड विजयसिंह गिड्डे 

byतरुण भारत
February 19, 2026
0

मोडनिंब - राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या प्रदेश सचिव पदी  मोडनिंब (ता. माढा) येथील अॅंड विजयसिंह गिड्डे यांची निवड झाली...

कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळे हत्तूरचा बालेकिल्ला शिवसेनेच्या ताब्यात 

byतरुण भारत
February 15, 2026
0

दक्षिण सोलापूर - लाडकी बहीण व भाजपच्या लाटेतही हत्तूरचा बालेकिल्ला ताब्यात ठेवण्यात शिवसेनेला यश आला आहे. जिल्हाप्रमुख अमर पाटील यांची...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0874093

वृत्त संग्रह

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697