
सोलापूर – विजेच्या खांबावर चढून काम करत असताना अचानक शॉक बसल्याने खाली कोसळून ३१ वर्षीय वायरमन गंभीर जखमी होऊन उपचारापूर्वी मरण पावला . ही घटना जुळे सोलापूरातील एजी पाटील नगरात आज बुधवारी सायंकाळच्या सुमारास घडली.
इस्माईल सलीम पटेल (वय ३२ वर्ष , रा. होटगीरोड मजरेवाडी , सोलापूर) असे मयत झालेल्या वायरमन चे नाव आहे. तो बुधवारी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास एजी पाटील नगरातील प्लॉट नं. ४२च्या समोरील विजेच्या खांबावर चढून काम करत होता. त्यावेळी शॉक बसल्याने तो खाली कोसळून बेशुद्ध झाला होता . त्याला ज्ञानेश्वर जाधव (मित्र) याने येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले .
मयत इस्माईल पटेल हा सोलापूर महानगरपालिकेत कंत्राट बेसिस वर काम करायचा . तो विवाहित असून तो एकुलता होता. त्याच्या पश्चात आई – वडील , पत्नी, तीन बहिणी असा परिवार असल्याची माहिती नातेवाईकांनी दिली .
























