अक्कलकोट – अक्कलकोट माझे माहेर वटवृक्षाच्या पारंब्यात आमच जीवन व्यतीत झाले . गाण्याची सुरवात अक्कलकोट मधुनच झाली आहे साऱ्याच्या सहकार्याने स्वामीचरणी गानसेवेची संधी मिळाली हे भाग्याचा क्षण आहे असे भावपूर्ण उद्गार मीरा कुलकर्णी यांनी केले
श्री स्वामी महाराजांच्या १४ ८ व्या पुण्यतिथी निमित्य धर्मसंकीर्तन महोत्सवाचा प्रारंभ शुक्रवारी झाला .
मुख्य गायक मीरा कुलकर्णी ( सी ए ) सह गायिका अर्चना कुलकर्णी ,विणा देशपांडे तबला जगदीश सोनवणे हार्मोनियम ,ओंकार पाठक , ताल अक्षय सरदेशमुख , आदि सहकार्यांनी पुण्यतिथी महोत्सवात भक्ती संगीत सादर केले . सर्व गायक कलाकारांचा श्री स्वामी महाराज देवस्थान चे चेअरमन माजी नगराध्यक्ष विद्यमान नगरसेवक महेश इंगळे यांच्या हस्ते समर्था चे कृपा वस्त्र श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला .
भक्ती संगीत गान सेवेत मीरा कुलकर्णी व सहकार्यानी भाग्यदा लक्ष्मी बारम्मा , स्वामी समर्थ माझी आई ,धाव पाव स्वामी समर्था ,खेळ मांडियला वाळवंटी ‘ ऐसी लागी लगन मीरा होगई मगन , जेथे जातो तेथे तु माझा सांगा की चालविशी हाती ‘ , देव माझा विठू सावळा , काय चुकले स्वामी समर्था ‘ अशी भाविकांच्या ओठावरील गीते सादर केली रसिक श्रोत्यांची वाहवा मिळवली . निशंक हो निर्भय हो मना रे तारक मंत्राने भक्ती संगीताची सांगता झाली .
याप्रसंगी देवस्थानचे चेअरमन माजी नगराध्यक्ष नगरसेवक महेश इंगळे ‘ सचिव आत्माराम घाटगे ,विश्वस्त महेश गोगी. , प्रथमेश इंगळे , विश्वस्त उज्वलाताई सरदेशमुख राजाभाऊ सरदेशमुख ‘ बबलादकर ‘ श्रीमुख जगदाळे , लक्ष्मण पाटील प्रकाश अवधानी सैदप्पा इंगळे राजू भोसले ,देशपांडे बाळासाहेब कुलकर्णी बबलादकर देसाई ,सागर गोन्डाळ ,श्रीशैल गंवडी , बाळासाहेब एकबोटे . ‘ सुरेखा तेली , .निगुताई हिंडोळे , रमेश शिंदे ‘मोरे , प्रसाद सोनार ‘ऋषी लोणारी ‘ स्वामी लोणारी ‘ काशीनाथ इंडे , संजय पवार आदि भक्त गण मोठ्या संख्येने उपस्थित होते .


















