मोडनिंब – (ता. माढा) येथील सखुबाई रामचंद्र ट्रस्ट संचलित श्री १००८ आदिनाथ भगवान दिगंबर जैन अतिप्राचीन मंदिर येथे कार्तिक अष्टान्हिका महापर्वानिमित्त आयोजित श्री सिद्धचक्र महामंडल विधानाची आठ दिवसांच्या धार्मिक कार्यक्रमांनंतर बुधवारी महाशांती मंत्र व होमविधीने सांगता करण्यात आला. दि. १७ ते २४ नोव्हेंबर या कालावधीत आयोजित या धार्मिक सोहळ्यात दररोज सकाळी भगवंतांचा जलाभिषेक, पूजाविधी, श्री सिद्धचक्र विधान तसेच सायंकाळी जंबूद्वीप जयमाला व मंगल आरती असे विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले. या विधानामध्ये दररोज सुमारे ४० ते ५० श्रावक-श्राविकांनी सहभागी होत धर्मलाभ घेतला.या धार्मिक सोहळ्याला पंडित शहा यांचे मार्गदर्शन लाभले. विविध धार्मिक विधी पार पडले. विधानाच्या माध्यमातून श्रावक-श्राविकांना धार्मिक परंपरा, भक्ती आणि जिनधर्माच्या तत्त्वांची माहिती मिळाली.आठ दिवसांच्या या सोहळ्यामुळे मंदिर परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते. मंत्रोच्चार, पूजाविधी आणि भगवंतांच्या जयघोषाने परिसर दुमदुमून गेला होता.या धार्मिक कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सखुबाई रामचंद ट्रस्टचे विश्वस्त, पंडित शहा, सहभागी श्रावक-श्राविका आणि समाजबांधवांनी परिश्रम घेतले.
‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला
सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...





















