सोलापूर : निलम नगर येथील नेताजी सुभाषचंद्र बोस प्रशालेत अगस्त फाउंडेशनच्यावतीने आयोजित विज्ञानाधारित उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांनी नाविन्यपूर्ण वैज्ञानिक मॉडेल्सचे उत्साहात सादरीकरण केले .
अगस्त फाउंडेशनच्या स्वयंसेविका पूजा कंटीकर व महादेवी पाटील यांनी प्रशालेतील विद्यार्थ्यांना विविध कृती, प्रयोग व उपक्रमांद्वारे मार्गदर्शन केले.
यावेळी विद्यार्थ्यांना दैनंदिन जीवनातील समस्या शोधून त्यावर आधारित वैज्ञानिक साहित्य तयार करण्याचे आव्हान देण्यात आले होते. या आव्हानाला विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत तब्बल १७ गटांनी १७ स्वतंत्र व नाविन्यपूर्ण मॉडेल्स तयार केली व उत्तमरित्या सादरीकरण केले.
विजेत्या मॉडेल्सची निवड खालीलप्रमाणे :
प्रथम क्रमांक -मिलिंद मार्कंटी, विनायक हंचनाळ (डिच मास्टर नाला क्लीनर ३०००),द्वितीय क्रमांक -अंजली तावस्कर, जानवी कांबळे, अलैक्या कोतम, ऐश्वर्या चिकणी(बेबी क्रॅडल),तृतीय क्रमांक – अक्षया चेट्टीपेल्ली, आरोही काशीद(आधुनिक टिफिन बॅग),उत्तेजनार्थ – श्रेया नडगेरी, कीर्ती जुजगार(स्मार्ट बॅग)श्रुती बाबा, संध्या जुजगार( बेबी सेफ्टी हेल्मेट)
या सर्व यशस्वी बालवैज्ञानिक विद्यार्थ्यांना प्रशालेचे मुख्याध्यापक रविशंकर कुंभार पर्यवेक्षक गौरीशंकर आळंगे, विज्ञान शिक्षक शितलकुमार पाटील तसेच अगस्त फाउंडेशनच्या स्वयंसेविका पूजा कंटीकर व महादेवी पाटील आदी मान्यवरांच्या हस्ते बक्षीस देऊन गौरविण्यात आले.
Views: 18