सोलापूर – सन्मती ज्ञान प्रसारक मंडळ संचलित श्री नवलबाई फुलचंद शहा कोठारी हायस्कूलमध्ये गणेशोत्सवानिमित्त विविध सांस्कृतिक कार्यक्रम,यामध्ये कागद काम, पर्यावरण पूरक गणपती तयार करणे या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले.तसेच दशलक्षण धर्मावर आधारित गणेशोत्सव व पर्युषण पर्व व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले होते.आज श्री गणेश विसर्जनानिमित्त विद्यार्थी व पालकांसाठी महाप्रसादाचा वाटप करण्यात आला. या महाप्रसादात पुरी भाजी, शिरा, भात,आमटी देण्यात आली. यासाठी मुख्याध्यापक, शाळा व्यवस्थापन समिती,मातापालिका समिती, पालक, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचा मोलाचा सहकार्य लाभला.
Post Views: 35