मंगळवेढा – भीमा नदीवरील मौजे वडापूर, ता. दक्षिण सोलापूर, जि. सोलापूर येथील कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्याचे बॅरेजमध्ये रूपांतर करण्याचे काम सध्या सुरु करणेचे आहे येथील अस्तित्वातील पूल हा माझ्या मतदार संघातील सिद्धापूर व दक्षिण सोलापूर तालुक्यातील वडापूर या गावांना जोडणारा अत्यंत महत्त्वाचा दुवा आहे. या पुलावरून स्थानिक नागरिक, शेतकरी, विद्यार्थी, रुग्णवाहिका तसेच इतर वाहने यांची मोठ्या प्रमाणावर वाहतूक होत असते. मात्र सद्यस्थितीत अस्तित्वातील रस्ता व पूल हे अत्यंत अरुंद असून वाढत्या वाहतुकीसाठी अपुरे आहेत. तसेच पावसाळ्यामध्ये भीमा नदीला पूर आल्यानंतर साधारण दोन महिने हा पूल पाण्याखाली जात असल्यामुळे नागरिकांना तसेच वाहनांना ये-जा करणे पूर्णपणे अशक्य होते. परिसरामध्ये पर्यायी पूल उपलब्ध नसल्याने दोन्ही गावांमधील दळणवळण, शैक्षणिक, आरोग्य व कृषी विषयक सर्व व्यवहार मोठ्या प्रमाणात विस्कळीत होतात, त्यामुळे येथील बंधाऱ्याचे रुंदीकरण करून बेरजेस कम पूल असा येथील बंधारा तयार करण्यात यावा अशी मागणी आमदार समाधान आवताडे यांनी जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे कडे केले आहे
त्यांनी दिलेल्या पत्रात पुढे असे म्हटले आहे की
वरील बाबींचा विचार करता वडापूर येथील बंधाऱ्याचे बॅरेजमध्ये रूपांतर करण्याच्या कामासोबतच पूरस्थितीत ही वाहतूक सुरळीत राहील अशा उच्च पातळीवर पुलाच्या कामाचा समावेश करण्यात यावा, सदर बंधाऱ्याच्या लाभक्षेत्रामध्ये माझ्या पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदार संघातील मंगळवेढा तालुक्यातील सिद्धापूर व तामदर्डी ही गावे समाविष्ट आहेत.
सदर बंधाऱ्याचे काम करत असताना दळणवळणासाठी अस्तित्वातील जुन्या रस्त्याचा वापर करण्यात येणार असल्याचे समजते.. सदर पूल झाल्यास सिद्धापूर, वडापूर तसेच परिसरातील अनेक गावांतील नागरिकांना वर्षभर सुरक्षित व अखंड दळणवळणाची सुविधा उपलब्ध होईल.
तरी, आपण सदर मागणीचा सहानुभूतीपूर्वक व तातडीने विचार करून आवश्यक कार्यवाही करावी, अशी मागणी आमदार अवताडे यांनी केली आह
चौकट
कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्याचे बॅरेजमध्ये रूपांतर करण्याच्या सर्वेक्षणास मंजुरी द्या-
पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदार संघातील पंढरपूरातील भीमा नदी आणि माण नदी वरील कोल्हापूर पद्धतीचे बंधारे जुने झाले असून पावसाळी हंगामात बर्गे टाकून पाणी अडवण्याची तरतूद नसल्याने १५ ऑक्टोबरनंतर बर्गे टाकून सुद्धा अपेक्षित पाणी साठा होत नाही. उजनी धरणाची जितकी पाणी साठवण क्षमता आहे, त्यापेक्षा कितीतरी जास्त येणाऱ्या पुराचे पाणी वाहून जाते.
तरी, भीमा नदीवरील बंधारे मुंडेवाडी, बठाण, माचणूर आणि अरळी तसेच माण नदी वरील महमदाबाद शेटफळ, गुंजेगाव, मारापूर, मल्लेवाडी आणि मुढवी या कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्याचे बॅरेजमध्ये रूपांतर करण्यासाठी सर्वेक्षण आणि अन्वेषण करण्याच्या कामास मंजुरी मिळावी अशीही मागणी आ. समाधान आवताडे यांनी जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे कडे केली आहे.
Post Views: 11