सोलापूर : श्री पद्मावती ब्रह्मोत्सवम संस्था, सोलापूरच्या वतीने आयोजित ‘पूट्टींटी पट्टुचिरा’ कार्यालयाचे उद्घाटन शनिवार, दि. ५ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी ११ वाजता स्वराजली चॅनल, दत्त नगर, सोलापूर येथे उत्साहात करण्यात आले.
कार्यक्रमाच्या प्रमुख उद्घाटक मा. ज्योतीताई वाघमारे, राज्यसभा खासदार आणि मा. श्री. सत्यनारायण बोल्ली, सहकार नेते व प्रेसिडेंट, मार्कंडेय रुग्णालय होते. प्रमुख उपस्थितांमध्ये श्री. सुरेश फलमारी (अध्यक्ष, पद्मशाली ज्ञाती संस्था), डॉ. सौ. जान्हवी माखिजा (संस्थापिका, कृष्णा फाउंडेशन) आणि श्री. पेंटप्पा अण्णा गड्डम (अध्यक्ष, यंत्रमागधारक संघ) यांचा समावेश होता.
यावेळी बोलताना राज्यसभा खासदार ज्योतीताई वाघमारे यांनी सोलापूर ते तिरुपती जाण्यासाठी दोन स्वतंत्र रेल्वे डब्यांची सोय उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. गेल्या १७ वर्षांपासून सुरू असलेल्या पूट्टींटी पट्टुचिरा परंपरेचे त्यांनी कौतुक केले आणि या उपक्रमासाठी सर्वतोपरी मदत करण्याचे अभिवचन दिले.
‘पूट्टींटी पट्टुचिरा’ ही परंपरा सोलापूरच्या पद्मशाली समाजासाठी श्रद्धा, संस्कृती आणि सामाजिक एकतेचे प्रतीक असून, या परंपरेला अधिक व्यापक स्वरूप देण्यासाठी संस्था प्रयत्नशील राहणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संस्थेचे सचिव श्री. व्यंकटेश रा. पडाल यांनी केले. प्रास्ताविक अध्यक्ष श्री. अंबादास बिंगी यांनी केले, तर आभार प्रदर्शन संस्थेचे उपाध्यक्ष श्री. गोपीकृष्ण वड्डेपल्ली यांनी केले.
यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष श्री. गोपीकृष्ण वड्डेपल्ली, श्री श्रीकांत कोंडा, श्री. दत्तात्रय पोसा, श्री. व्यंकटेश रच्चा, सौ. माधवी अंदे, श्री. दामोदर पासकटी, श्री. अशोक बिटला, सौ. ममता तलकोकुल, सौ. ममता दुधगुंडी, श्रीनिवास करली, रामचंद्र जन्नु, महाकाली येलदी, नगरसेवक प्रियदर्शन साठे, दयानंद मांमड्याल आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी संस्था पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले. अध्यक्ष श्री. अंबादास बिंगी व सचिव श्री. व्यंकटेश रा. पडाल यांनी उपस्थित मान्यवरांचे व समाजबांधवांचे आभार मानले.
‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला
सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...






















