पद्मशाली शिक्षण संस्था संचलित विडी घरकुल भागातील मातोश्री जनाबाई बिटला प्रशालेत पर्यावरण पूरक गणपती निर्मिती उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांनी शाडू माती आणि पर्यावरण पूरक साहित्याचा वापर करून आकर्षक गणपतीची मूर्ती तयार केल्या.
प्रशालेच्या मुख्याध्यापिका शारदा गोरट्याल यांनी गणेशोत्सवानिमित्त आयोजन आयोजन केलेल्या या उपक्रमासाठी चित्रकला शिक्षक जगदीश परांडकर यांनी विद्यार्थ्यांना आकर्षक गणपती मूर्ती बनवण्याचे प्रशिक्षण दिले. विद्यार्थ्यांना गणेश मूर्ती निर्मितीची माहिती देतानाच पर्यावरण पूरक गणेशोत्सवाचे महत्त्व समजावून सांगण्यात आले.
“अशा उपक्रमांमधून विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलतेला वाव मिळतो आणि विद्यार्थ्यांना स्वनिर्मितीचा आनंद मिळतो. तसेच पर्यावरण पूरक गणपती निर्मितीतून विद्यार्थ्यांना पर्यावरण संवर्धनाचे महत्त्व कळते ” असे प्रतिपादन मुख्याध्यापिका शारदा गोरट्याल यांनी केले. यावेळी प्रशालेतील सर्व शिक्षक वृंद उपस्थित होते.
विद्यार्थ्यांच्या कलाकृती पाहून पद्मशाली शिक्षण संस्थेचे अध्यक्ष ऍड.श्रीनिवास क्यातम,उपाध्यक्ष प्रा. श्रीनिवास कोंडी,सचिव दशरथ गोप,सहसचिव मल्लिकार्जुन सरगम खजिनदार गोवर्धन कमटम,शालेय समिती अध्यक्ष विजयकुमार गुल्लापल्ली तसेच प्रशालेचे देणगीदार सुरेश बिटला यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले.
‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला
सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...






















