सांगोला – अकोला (ता.सांगोला) येथील सेवानिवृत्त मुख्याध्यापक तानाजी केदार यांनी वडील तुकाराम केदार व आई कस्तुराबाई केदार यांच्या स्मरणार्थ सांगोला तालुका पेन्शनर संघटना कार्यालयाला कपाट सप्रेम भेट दिले. याप्रसंगी सेवानिवृत्त केंद्र मुख्याध्यापक सुरेश ढोले, संस्थेचे संचालक शंकरराव सावंत, दिनकर घोडके, सहसचिव दत्तात्रय खामकर, प्रगतशील शेतकरी तुकाराम नवले उपस्थित होते. यावेळी ज्ञानदानापासून समाजकार्यापर्यंत निवृत्तीनंतरही अखंड ध्येय यज्ञ जोपासणारे तानाजी केदार हे आहेत असे सुरेश ढोले यांनी तर त्यांचे शेकडो विद्यार्थी प्रशासकीय सेवेत व औद्योगिक क्षेत्रात कार्यरत आहेत त्याचा आम्हास अभिमान आहे असे दिनकर घोडके यांनी मनोगत व्यक्त केले.