Sunday, August 2, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

पर्यावरण संवर्धनासाठी राज्याच्या शहरी भागामध्ये ‘अर्बन फॉरेस्ट’ तयार करणार  – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

तरुण भारतbyतरुण भारत
November 3, 2025
in solapur
0
0
SHARES
16
VIEWS
Share on FacebookShare on Twitter


पंढरपूर –  वातावरणातील प्रदूषणाचे प्रमाण वाढल्याने वातावरणात अनेक अनिष्ट बदल होत आहेत. त्यामुळे नैसर्गिक आपत्ती सह प्रदूषणीय आपत्ती मध्ये वाढ होत आहे. त्यामुळे पर्यावरण संवर्धन ही काळाची गरज असून त्यासाठी वृक्ष लागवड व संवर्धन अत्यंत महत्त्वाचे आहे. नगर विकास विभागाच्या मार्फत राज्यातील सर्व महापालिका, नगरपरिषदा, नगरपालिका व नगरपंचायती मध्ये “अर्बन फॉरेस्ट” हा उपक्रम राबवण्यात येणार असून यात नागरिकांनी सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.
पंढरपूर येथील शासकीय विश्रामगृहाच्या परिसरात महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, पर्यावरण विभाग व महाराष्ट्र सांस्कृतिक कला मंच ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवारी आयोजित ‘कार्तिकीची वारी पंढरीच्या दारी’ या उपक्रमाच्या समारोपप्रसंगी उपमुख्यमंत्री श्री.शिंदे बोलत होते.
यावेळी ग्रामविकास व पंचायतराज मंत्री तथा पालकमंत्री जयकुमार गोरे, रोजगार हमी योजना, फलोत्पादन मंत्री भरत गोगावले, गृह (शहरे), महसूल राज्यमंत्री योगेश कदम, प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष सिद्धेश कदम, आमदार समाधान आवताडे, आमदार तानाजी सावंत, आमदार राजू खरे, आमदार अभिजीत पाटील, माजी आमदार शहाजी बापू पाटील, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम, प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सचिव एम. देवेंद्र सिंह यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.
उपमुख्यमंत्री श्री शिंदे पुढे म्हणाले की, ग्लोबल वार्मिंग, क्लायमेट चेंज मुळे मे महिन्यात, नोव्हेंबर मध्ये पाऊस पडणे तसेच पावसाळ्यात ढगफुटी होऊन अतिवृष्टी, पूर परिस्थितीमुळे बळीराजाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. त्यामुळे पर्यावरणाचा समतोल राखणे अत्यंत गरजेचे असून त्यासाठी सर्व नागरिकांमध्ये वृक्ष लागवडीसाठी व पर्यावरण संवर्धनासाठी जनजागृती महत्वाची आहे. त्याप्रमाणेच ठाणे महापालिकेने चार ठिकाणी अर्बन फॉरेस्ट अंतर्गत मोठ्या प्रमाणावर वृक्ष लागवड केलेली आहे. तरी राज्यातील सर्व शहरांमध्ये स्थानिक प्रशासनाच्या माध्यमातून अर्बन फॉरेस्ट अंतर्गत वृक्ष लागवड  करावी. त्याप्रमाणेच राज्यात बांबू लागवडीचे क्षेत्र किमान एक लाख हेक्टर पर्यंत वाढवावे, यासाठी प्रदूषण नियंत्रण मंडळाने प्रयत्न करावेत. बांबू ही बहुपर्यायी तसेच पर्यावरण पूरक वृक्ष लागवड आहे असे त्यांनी सांगितले.
महाराष्ट्र राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष सिद्धेश कदम यांनी प्रदूषण मंडळाच्या माध्यमातून पर्यावरण पूरक असलेल्या बांबू लागवडीचा उपक्रम मोठ्या प्रमाणावर हाती घेण्यात आल्याचे सांगून पर्यावरण संवर्धनासाठी संपूर्ण राज्यभरात जनजागृती मोहीम राबवली जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

यावेळी उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कार्तिकीची वारी, पंढरीच्या दारी या पर्यावरण शिक्षण उपक्रमाचा समारोप झाला. प्रदूषण मंडळाचे सदस्य सचिव एम.डी. सिंह यांनी प्रस्ताविक केले तर आभार संजय भुस्कुटे यांनी मानले.

—————-


संस्कृती कला मंचच्या वतीने पर्यावरणाचा संदेश –
प्रारंभी संस्कृती कला मंचच्या वतीने किर्तन, भारुड, गोंधळ व पोवाडा या माध्यमातून पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला. कीर्तनकार प्रकाश खांडगे, मानसी बडवे, शैलजा खांडगे, योगेश चिकटगावकर, शाहीर प्रवीण जाधव यांचा सन्मान उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला.यावेळी उपमुख्यमंत्री तसेच सर्व मान्यवरांनी टाळ मृदंगाच्या गजरात पावली केली. 
————–

अतिवृष्टी व पूरपरिस्थितीमुळे शेतकऱ्यावर संकट – राज्यातील शेतकऱ्यावर अतिवृष्टी व पूर परिस्थितीमुळे मोठे संकट आलेले आहे, शासन सर्व शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असून शेतकरी कर्जमाफीसाठी शासनाने समिती गठीत केलेली आहे. या संकटाच्या काळात जी तातडीची मदत करावयाची होती ते शासन शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर थेट जमा करत असल्याचेही माहिती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.
—————-


लहानमुलांना वृक्ष संवर्धनाबाबत जागृत केले पाहिजे –
पर्यावरण समतोल राखण्यासाठी प्रदूषण नियंत्रण मंडळाची भूमिका अत्यंत महत्त्वाची असून लहान मुलांमध्ये पर्यावरण जागृती करण्यासाठी त्यांना शालेय जीवनापासूनच वृक्ष संवर्धनाचे महत्त्व याबाबत जागृत केले पाहिजे. पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी जनजागृती शिवाय दुसरा पर्याय नाही. तसेच आषाढी व कार्तिकी वारी पुरते पर्यावरण जागृतीचा संदेश देण्याशिवाय संपूर्ण वर्षभर सातत्याने असे उपक्रम राज्यभरात घेण्यासाठी प्रदूषण मंडळ व पर्यावरण विभागाने नियोजन करावे, यासाठी आवश्यक सर्व प्रकारचे सहाय्य करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.
—————— 


रायगड किल्यापासून गडकिल्यांच्या स्वच्छता मोहिम – राज्यातील सर्व गडकिल्ले ही खूप मोठी संपत्ती असून हे गड किल्ले स्वच्छ करण्याची मोहीम लवकरच रायगड किल्ल्यापासून करावी. प्रदूषण मंडळाने पर्यावरण समतोल तसेच जनजागृतीसाठी अद्यावत तंत्रज्ञान चा वापर करावा. सध्याचे कृत्रिम बुद्धिमत्ता या तंत्रज्ञानाचा वापर अत्यंत कुशल पद्धतीने करावा.
——————


राज्याच्या सर्वांगीण विकासाचे वारकरी व्हावे –
पर्यावरण संवर्धनासाठी नैसर्गिक शेतीकडे वळले पाहिजे याबाबत शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करावी असेही आवाहन उपमुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी केले. पर्यावरण पूरक विकासासाठी सर्वांनी सहभाग घ्यावा तसेच प्रत्येकाने राज्याच्या सर्वांगीण विकासाचे वारकरी व्हावे असेही आवाहन त्यांनी केले.

Post Views: 44
Previous Post

दर्शन मंडपाचे काम जलद गतीने करून भाविकांना कमी वेळेत दर्शनाची सुविधा द्यावी – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Next Post

शहर – तालुक्यात बोगस जातीच्या दाखल्यांचा सुळसुळाट !

तरुण भारत

तरुण भारत

Next Post

शहर - तालुक्यात बोगस जातीच्या दाखल्यांचा सुळसुळाट !

ताज्या बातम्या

रेशीम शेतीला बाजारपेठेची नवी संजीवनी हिरज येथे रेशीम कोष लिलावाला उत्स्फूर्त प्रतिसाद

रेशीम शेतीला बाजारपेठेची नवी संजीवनी हिरज येथे रेशीम कोष लिलावाला उत्स्फूर्त प्रतिसाद

August 1, 2026

सोलापूर विद्यापीठाच्या वर्धापन दिनी इतिहासतज्ज्ञ गोपाळ देशमुखांना जीवन गौरव पुरस्कार प्रदान

August 1, 2026
३ ऑगस्ट रोजी जन्मणाऱ्या मुलींच्या नावे प्रत्येकी १५ हजार रुपयाची रक्कम मुदत ठेव म्हणून ठेवणार 

३ ऑगस्ट रोजी जन्मणाऱ्या मुलींच्या नावे प्रत्येकी १५ हजार रुपयाची रक्कम मुदत ठेव म्हणून ठेवणार 

August 1, 2026
एमआयडीसीतील टॉवेल कारखान्यात वेस्टेज कापसाला आग

एमआयडीसीतील टॉवेल कारखान्यात वेस्टेज कापसाला आग

August 1, 2026
कासेगावच्या महसूल समाधान शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

कासेगावच्या महसूल समाधान शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

August 1, 2026

पवित्र’ भरतीत नवा ट्विस्ट ! मंजूर जाहिराती रद्द करण्यासाठी सोलापूरहून शिक्षण संचालकांना पत्र

August 1, 2026

विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी अभाविपचा मंत्र्यांकडे पाठपुरावा

August 1, 2026

शिवछत्रपतींच्या शुद्धीकरण मोहिमेला ३५० वर्ष पूर्ण 

August 1, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

1022219

वृत्त संग्रह

August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!