श्रीपूर – परिस्थिति कितीही बिकट असली तरी कठोर परिश्रमातून यशस्वी झालेली माणसे आपण समाज जीवना मध्ये पाहतो . परंतु परिस्थितीही बेताची व जन्मतः च डाव्या हाताला आलेले अपंगत्व यावर मात करत श्रीपूर ( सेक्शन चौदा ) येथिल धनराज संतोष भाग्यवंत यांने जिद्द व कठोर परिश्रमातून आपली वाटचाल चालू ठेवत कुटूंबाचा गाडा चालवत आहे .
धनराज म्हणजे खरे तर सडसडीत उंच बांध्याचा तरुण परंतु दुदैवाने जन्मतःच त्याच्या डाव्या हातांच्या बोटांची वाढ न झाल्याने नुसते मनगटच परंतू याने तो कसलाच खचला नाही . आपले प्राथमिक व माध्यमिक शिक्षण झाल्यावर व घरच्या बेताच्या परिस्थिती मुळे त्यांने १० वी नंतर खंडाळी (ता. माळशिरस ) येथे इलेक्ट्रीशियन चा आयटीआय चा कोर्स पूर्ण केला . परंतु अपंगत्वामुळे कंपनीत काम लागणे अवघड झाले . त्यामुळे नाविलाजाने एम एस ई बी मध्ये कॉन्ट्रक्ट पद्धतीने काम करावे लागले .
आता एम एस ई बी मधील काम म्हणजे सिमेंट अथवा लोखंडी पोलवर चढून काम करावे लागते . परंतू कसलीही हार न मानता धनराजने ते काम स्वीकारले आज त्याची काम करण्याची चलाखी पाहता माणूस आचंबित होतो .
कारण पोलवर चढताना दोन हातांची गरज असते याचे डावे हाताला बोटे नाहीत अशा परिस्थितित तो उजवा हात व डाव्या मनगटाचे जोरावर लिलया काही क्षणात पोलवर चढतो व वायर जेडणीचे काम करतो . अलीकडे अशा पोलवर चढण्यासाठी विशिष्ट प्रकारचे जुगाड केलेले दिसून येते त्या वरून कमी कष्टाने वर जाता येते परंतू धनराज या जुगाडाचा वापर न करताही सफाईने पाय व हातांच्या सहाय्यांनी पोलवर जातो . आज अनेकता काम मिळत नाही म्हणून व्यवस्थेला नावे ठेवणारी मंडळी दिसून येतात परंतू जिद्द असेल तर अशक्य ते शक्य होते हे दाखवून देणारा धनराज भाग्यवंत म्हणूनच कौतुकाचा विषय होतो .
धनराजचे वडिल ड्रायव्हर म्हणून सिझलन काम करतात आई घरकामात तर धाकटा भाऊ बीकॉम करत करत असल्याचे धनराज सांगतो . एम एस ई बी मध्ये तो सागर कांबळे याचे हाताखाली काम करतो तेव्हा कांबळे सांगतात धनराज सारखा प्रामाणिक कष्ट करणारा विरळाच माणूस आहे तो अखंड कामातच असतो करतलाच आळस अंगात नाही म्हणूनच धनराज हा तरुणांपुढे एक आदर्श आहे .

























