पिलीव – माळशिरस तालुक्यातील पिलीव येथील शतकी वाटचाल करणाऱ्या पिलीव विविध कार्यकारी सहकारी सेवा संस्थेच्या वतीने याही वर्षी आमदार उत्तमराव जानकर यांच्या मार्गदर्शनाखाली धानोरे ग्रामपंचायतीचे माजी सरपंच युवक नेते जीवन भैया जानकर यांच्या हस्ते लाभांशाचे वाटप करण्यात आले
यावेळी नागरी आघाडीच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल माजी सरपंच अमोल मदने पाटील ,जन आरोग्य समितीपदी नियुक्ती झाल्याबद्दल लहु पाटील तसेच तज्ञ संचालक म्हणून निवड झालेले आबा माने ,अर्जुन वाघ त्यांच्यासह मान्यवरांचा सत्कार जीवन जानकर यांच्या हस्ते करण्यात आला .यावेळी संस्थेच्यावतीने 1239 सभासदांना 7,95 ,854 रुपये एवढा बोनस वाटप करण्यात आला .यावेळी चेअरमन पंकज विठ्ठल मदने , माजी ज्येष्ठ संचालक बाबुराव पाटील ,संग्राम पाटील ,अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक बाबुराव कदम ,किसन सातपुते ,अमोल मदने पाटील आबा माने, आनंद पाटील,श्यामराव मदने, नबाजी मदने , विठ्ठल मदने सर ,आनंद पाटील, सुग्रीव लेंगरे,कुबेर भैस, सिताराम धायगुडे,अण्णा सुळे, शामराव गलांडे ,तानाजी शेंडगे प्रा. संजय पाटील दामोदर लोखंडे सचिव श्रीकृष्ण सावंत ,लेखनिक विजय सपाटे ,महेश पाटील ,सुरज काटकर आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते यावेळी धानोरे गावचे माजी सरपंच जीवन जानकर यांनी विकास संस्था ही शेतकऱ्याची गरज भागवणारी वरदायीनी असून वेळोवेळी लागणारी आर्थिक मदत करणारी संस्था असून कर्ज घेणारांनी कर्ज वेळेत फेड करावी व संस्था चांगली चालवण्यासाठी सर्व सभासदांनी सहकार्य करण्याचे आव्हान त्यांनी यावेळी केले
माजी संचालक बाबुराव पाटील यांनी प्रास्ताविकात संस्थेच्या आर्थिक कारभाराविषयी सविस्तर माहिती दिली तसेच यावेळी संग्राम पाटील ,अमोल मदने पाटील प्रा.विठ्ठल मदने ,शिवाजी उर्फ दादासाहेब पिसे माळी व सचिव श्रीकृष्ण सावंत यांनी मनोगत व्यक्त करून संस्थेविषयी माहिती देऊन प्रातिनिधिक स्वरूपात पाच बोनस धारक सभासदांना वाटप करण्यात आले व दिवाळीच्या शुभेच्छा व्यक्त करण्यात आल्या.
आभार प्रदर्शन माजी चेअरमन संग्राम पाटील यांनी व्यक्त केले फोटो_
पिलीव विविध कार्यकारी सहकारी सेवा संस्थेच्या वतीने सभासदांना लाभांश वाटप करताना,जिवन जानकर, चेअरमन पंकज मदने,