सोलापूर – जुळे सोलापूर: येथील वसुंधरा कला महाविद्यालयातील शारीरिक शिक्षण संचालक डॉ. अशोक पाटील नियत वयोमानानुसार सेवेतून निवृत्त झाले आहेत. त्याबद्दल त्यांचा शाहू शिक्षण संस्था आणि वसुंधरा महाविद्यालयाच्या वतीने सत्कार समारंभ करण्यात आला. याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. दिगंबर झोंबाडे, ज्ञानज्योती विद्यालयातील मुख्याध्यापक जनार्दन चव्हाण, स्वामी विवेकानंद प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य शिवाजी काशीद, अनुराधा विधी महाविद्यालयाच्या प्राचार्या पिरजादे इत्यादीची प्रमुख उपस्थिती होती. यासाठी शाहू शिक्षण संस्थेचे सचिव अभिजीत ढोबळे यांचे मार्गदर्शन लाभले. यावेळी महाविद्यालयातील प्राध्यापकांनी डॉ. अशोक पाटील यांच्या विषयी आपले अनुभव कथन केले. तर अध्यक्षीय आढाव्यात महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. दिगंबर झोंबाडे यांनी प्रत्येकजण सेवेतून निवृत्त होतो, तो एक सेवेचा भाग असला तरी त्याचे कार्य कर्तुत्वाची जाणीव त्यांनी केलेल्या कामगिरीवर होत असते. असे मत मांडले.
सचिन कोलते मित्रपरिवार, विजापूर नाका परिसरातील मित्रमंडळी यांनी डॉ. अशोक पाटील यांचा विशेष सत्कार केला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. डॉ. तानाजी देशमुख, आभार डॉ संगीता भोसले यांनी मांडले.
Post Views: 7