पिलीव – माळशिरस तालुक्यातील पिलीव परीसरात गेल्या काही दिवसांपासून जिओचे नेटवर्क गुल होत आहे यामुळे सध्या ग्राहक प्रचंड वैतागले आहेत. तर याबाबत संबंधित कंपनीकडे ग्राहक वारंवार तक्रारी करीत आहेत पण तक्रारीची कोणीच दखल घेत नाहीत. पण यामुळे सध्या पिलीव परिसरातील ग्राहक सध्या आयडीया _ वोडाफोन, एरटेल, बीएसएनएल या कंपनीकडे वळु लागले आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून हा नेटवर्क प्रॉब्लेम आहे.पण गेल्या महीनाभरापासुन पिलीव परीसरात कसलेच नेटवर्क उपलब्ध होईना यामुळे ग्राहक वारंवार तक्रारी करीत आहेत पण या तक्रारीची सदरची कंपनी कसलीच दखल घेत नाहीत. यामुळे अक्षरश जिओचा रिचार्ज वाया जात आहे.जर पिलीव परीसरातील जिओचया नेटवर्क प्रॉब्लेम सोडविला नाही ग्राहक इतर कंपनीकडे वळत असुन पिलीव परीसरातुन आपला गाशा गुडाळावा लागणार आहे हे नक्की आहे .यामुळेच जि ओ कंपनीने पिलीव परीसरातील नेटवर्क प्रॉब्लेम सोडवुन ताबडतोब चांगली सेवा देणयाची मागणी ग्राहकामधुन होत. चौकट _ याबाबत सोलापूर येथील कार्यालयातील अधिकाऱ्यांशी मोबाईलवरून संपर्क साधण्याचा प्रयत्न केला पण संबधीत अधिकाऱ्याने मोबाईल उचललाच नाही. चौकट _ पिलीव परीसरात गेल्या काही दिवसांपासून जि ओचे कसलेच नेटवर्क येत नाही यामुळे अक्षरश वैतागलो आहे .ताबडतोब नेटवर्क समस्या सोडवावी अन्यथा आम्ही कंपनीच बदलणार आहे ._ सचिन वाघमारे _ जि ओ ग्राहक.
‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला
सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...





















