करकंब : श्री.सद्गुरु भजलिंग महाराज ट्रस्ट करकंब यांच्यावतीने प्रतिवर्षाप्रमाणे अक्षयतृतीया आणि चंदन उटीचे औचित्य साधून दि.१७,१८,१९ एप्रिल रोजी सद्गुरु भजलिंग महाराज मठामध्ये संध्याकाळी ६ ते ८ या वेळेत ह.भ.प.डॉ.जयवंत महाराज बोधले यांचे अमोघ वाणीतून संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांनी लिहिलेल्या पसायदान या सुंदर विषयावर तीनदिवसीय प्रवचनमाला आयोजित करण्यात आली असल्याचे अध्यक्ष बाळासाहेब वास्ते यांनी सांगितले.
या अगोदरही कर्मयोग,भक्तीयोग,नामस्मरण आदी विषयांवर प्रवचनमाला झाली त्यासही भरभरून प्रतिसाद मिळाला होता.सदर ३ दिवस चालणाऱ्या प्रवचनमालेसही भाविक भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित उपस्थित राहून भरभरून प्रतिसाद देत अध्यात्मिक विचारांच्या मेजवानीचा सर्व करकंबकर आणि पंचक्रोशीतील भाविक भक्तांनी लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
प्रवचनमाला यशस्वी करण्यासाठी सद्गुरू भजलिंग महाराज ट्रस्ट,विद्या वास्ते,संजय दुधाणे,श्रीनिवास देशपांडे,ज्ञानेश्वर दुधाणे शिष्य परिवार अधिक परिश्रम घेत आहेत.






















