Friday, September 25, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

डॉ. नितीन कदम सरांनी सांगितला करिअर निवडीचा शास्त्रशुद्ध मार्ग

तरुण भारतbyतरुण भारत
May 7, 2026
in editor
0
डॉ. नितीन कदम सरांनी सांगितला करिअर निवडीचा शास्त्रशुद्ध मार्ग
0
SHARES
13
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

करमाळा – यशकल्याणी सेवाभवन येथे यशवंत अकॅडमीच्या उद्घाटन प्रसंगी ‘भविष्यातील करिअरची यशस्वी पायाभरणी’ याविषयावर मार्गदर्शन करताना दिशा अकॅडमी, वाई चे संस्थापक डॉ. नितीन कदम सर यांनी करमाळकरांना सांगितला करिअर निवडीचा शास्त्रशुद्ध मार्ग. करमाळ्यात नव्याने सुरू होत असलेल्या यशवंत अकॅडमीचे उद्घाटन मा. श्री. विलासरावजी घुमरे सर, मा. डॉ. नितीन कदम सर, मा. श्री. मिलिंद फंड सर, मा. डॉ. गणेश करे पाटील सर, मा. श्री. संजय राजगुरु साहेब, मा. श्री. बाळकृष्ण लावंड सर, मा. श्री. बाळासाहेब नरारे सर, मा. श्री. कल्याणराव साळुंके सर आदी मान्यवारांच्या हस्ते संपन्न झाले. या उद्द्घाटन प्रसंगी यशवंत अकॅडमीला शुभेच्छा देताना मा. श्री. विलासराव घुमरे सर यांनी करमाळ्यातील विद्यार्थी, पालक आणि शिक्षक यांच्याशी संवाद साधत शैक्षणिक परिस्थितीचा सखोल आढावा घेतला. तसेच विद्यार्थ्यांच्या हितासाठी यशवंत अकॅडमीला सर्वोतोपरी मदत करण्याची खात्री दिली.

डॉ. गणेश करे पाटील सरांनी करमाळा आणि परिसरातील विद्यार्थ्यांना बाहेरगावी जाऊन शिक्षण घेताना येणाऱ्या अडचणी आणि होणारा खर्च यातून मार्ग काढण्यासाठी यशवंत अकॅडमी सारख्या उत्तम शिक्षण देणाऱ्या शैक्षणिक संस्थांची गरज आणि उत्तम नियोजन व निकाल परंपरा असलेलल्या दिशा अकॅडमी सारख्या शैक्षणिक संकुलांची आवश्यकता आपल्या मनोगतातून अधोरेखित केली. त्याचबरोबर यशकल्याणी संस्थेकडून दोन्ही अकॅडमींना पाठबळ देण्याची ग्वाही दिली.

भविष्यातील स्पर्धा परीक्षांची तयारी यावर मत मांडताना डॉ. नितीन कदम सर यांनी सर्वसमावेशक मार्गदर्शन करून आजच्या विद्यार्थ्यांची करिअरची दिशा त्यांच्या गुणपत्रिकेतील गुणांवर न ठरवता त्यांच्या उपजत क्षमतेवर ठरवणे किती आवश्यक आहे सांगितले. तसे न केल्यास विद्यार्थ्यांच्या जीवनाची दशा झाल्याशिवाय राहणार नाही हेही नमूद केले. मुलांना भाषा, गणित, चित्रकला आणि मैदानी खेळ यांवर जोर देण्यास सांगितले. कौशल्ये आणि उपयोजन यांची पायाभरणी शालेय जीवनात होण्यासाठी आपण फाऊंडेशन कोर्सेसची सुरुवात त्यावर आधारित असणाऱ्या परीक्षांच्या तयारीतून करत आहोत. ज्ञानाचे उपयोजन आणि तेही अगदी जलद गतीने करता येणे म्हणजे स्पर्धा परीक्षेची तयारी होय.

जर स्पर्धा परीक्षेची तयारी लवकर सुरू केली तर १२ वी नंतरचे डिप्रेशनही येणार नाही आणि अफाट खर्च होणारा गॅपही घ्यावा लागणार नाही.

पालक व शिक्षक वर्गाशी हितगूज करताना डॉ. नितीन कदम सर म्हणाले की भविष्यात येणाऱ्या सर्व आव्हानांमध्ये आपले मूल टिकवायचे असेल तर त्याला त्याच्या नैसर्गिक उपजत क्षमतेवर त्याचे करिअर निवडू दया. तसे केल्यास कितीही वाईट परिस्थिती आली तरी ते मूल डगमगणार नाही. करमाळ्यातील पालकांचा यशवंत अकॅडमीला चांगला आधार मिळेल कारण ही अकॅडमी अर्थिक फायद्यासाठी नाही तर विद्यार्थ्यांच्या दर्जेदार शिक्षणासाठी काम करणार आहे.

या कार्यक्रमात सरस्वती विद्यालय व ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य मा. श्री. दत्तू इवरे सर यांनी आपले मनोगत मांडताना दोन्ही अकॅडमींच्या शैक्षणिक कार्यसंस्कृतीबद्दल गौरवोद्गार काढले. सिद्देश श्रीरामे (IIIT) व श्रेयस काटुळे (NIT) यांच्या यशाबद्दल त्यांच्या पालकांचा यथोचित सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमासाठी अनेक पालक आपल्या पाल्यांसोबत उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. जयेश पवार सर यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. विष्णू शिंदे सर आणि प्रा. संदिप इवरे सर यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा. राहुल श्रीरामे सर यांनी केले. कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी सौ. विनिता कांबळे मॅडम, सौ. माधुरी पवार मॅडम, सौ. सुवर्णा कांबळे मॅडम, श्रीमती अश्विनी पवार मॅडम, श्री. संतोष कांबळे सर, श्री. अतुल दाभाडे सर, श्री. संदिप पवार सर, श्री. कौस्तुभ सौंदाणे, इत्यादींचे सहकार्य लाभले.

Post Views: 120
Previous Post

अनुसूचित जातीच्या जागा जनरलला देऊ नये – केंद्रीय मंत्री रामदास आठवले

Next Post

इयत्ता नववीमध्ये 95.33% गुण मिळवून अधिराज घोलप प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण

तरुण भारत

तरुण भारत

Next Post
इयत्ता नववीमध्ये 95.33% गुण मिळवून अधिराज घोलप प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण

इयत्ता नववीमध्ये 95.33% गुण मिळवून अधिराज घोलप प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण

ताज्या बातम्या

पारंपारिक लेझीम रिंग टिपऱ्या आणि झांजसह निघाली ज्ञान प्रबोधिनी प्रशालेची मिरवणूक#solapur #yesnews

September 24, 2026

शेजाऱ्यानेच केली घरफोडी; १० ९६ लाखांचे सोने जप्त

September 24, 2026

देवगांवमध्ये एकास मारहाण; तिघांविरोधात तालुका पोलिसांत गुन्हा

September 24, 2026
बार्शीत गणेशमूर्ती प्रशासन सज्ज,  विसर्जनासाठी गणेश मूर्तीचे दोन तलावात होणार विसर्जन

बार्शीत गणेशमूर्ती प्रशासन सज्ज,  विसर्जनासाठी गणेश मूर्तीचे दोन तलावात होणार विसर्जन

September 24, 2026
महावितरणच्या लेखी आश्वासनानंतर युवा महासंघाचे आंदोलन स्थगित

महावितरणच्या लेखी आश्वासनानंतर युवा महासंघाचे आंदोलन स्थगित

September 24, 2026
लायन्स क्लब बार्शी राॅयलच्यावतीने दंत तपासणी व फळे-नॅपकिन वाटप

लायन्स क्लब बार्शी राॅयलच्यावतीने दंत तपासणी व फळे-नॅपकिन वाटप

September 24, 2026
कुमठ्यात रविवारी जलयात्रा महोत्सवाच्या आयोजन

कुमठ्यात रविवारी जलयात्रा महोत्सवाच्या आयोजन

September 24, 2026
मनोहर सपाटे यांना समाजभूषण पुरस्कार जाहीर

मनोहर सपाटे यांना समाजभूषण पुरस्कार जाहीर

September 24, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

1255540

वृत्त संग्रह

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!