कुरुल : येथील भीमशक्ती तरुण मंडळाच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 व्या जयंतीनिमित्त आयोजित करण्यात येणाऱ्या उत्सवासाठी जयंती उत्सव समितीची बैठक उत्साहात पार पडली. ही बैठक परशुराम गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली व लक्ष्मण भालेराव यांच्या अध्यक्षस्थानी होते.
बैठकीच्या सुरुवातीस धनाजी चंदनशिवे यांनी प्रस्ताविकातून जयंती उत्सवाचे महत्त्व अधोरेखित केले. त्यानंतर विविध विषयांवर सविस्तर चर्चा करत उत्सवाचे नियोजन करण्यात आले. सर्वानुमते समितीची नवीन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली असून, अध्यक्षपदी रोहित गायकवाड तर उपाध्यक्षपदी बाबा गायकवाड यांची निवड करण्यात आली.
यावेळी समाधान गायकवाड, संजय भालेराव, शंकर भालेराव, परशुराम गायकवाड, आदर्श भालेराव, नागेश भालेराव आदींची उपस्थिती होती.
यावेळी जयंतीनिमित्त दरवर्षीप्रमाणे याही वर्षी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली. तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेची भव्य-दिव्य मिरवणूक काढण्यात येणार असून, मोठ्या उत्साहात जयंती साजरी करण्याचा निर्धार कार्यकर्त्यांनी व्यक्त केला.
बैठकीस मंडळाचे सदस्य व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. उत्सव यशस्वी करण्यासाठी सर्वांनी एकजुटीने काम करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.






















