Sunday, February 8, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

कर्तव्य, कृतज्ञता आणि प्रेरणा – प्रिसिजन गप्पा 2025 चा अर्थपूर्ण समारोप

तरुण भारतbyतरुण भारत
November 10, 2025
in solapur
0
0
SHARES
9
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर – प्रिसिजन फाउंडेशनतर्फे आयोजित “प्रिसिजन गप्पा 2025” या सांस्कृतिक मेजवानीचा तिसरा आणि अंतिम दिवस सामाजिक कार्यकर्त्यांच्या सन्मानासाठी अर्पण करण्यात आला. सामाजिक जाण आणि योगदानाचा गौरव करणाऱ्या या दिवशी, शहर आणि जिल्ह्यातील दहा कार्यकर्त्यांना ‘प्रिसिजन सेवा सन्मान’ पुरस्काराने गौरविण्यात आले.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला डॉ. सुहासिनी शहा यांनी प्रिसिजन फाउंडेशनच्या विविध सामाजिक उपक्रमांचा आणि कार्याचा आढावा सादर केला. त्यानंतर सन्मान सोहळ्याची मुख्य सूत्रधार म्हणून प्रख्यात वक्ते, पत्रकार आणि मुलाखतकार डॉ. उदय निरगुडकर उपस्थित होते. त्यांच्या हस्ते पुरस्कारांचे वितरण करण्यात आले.

सुमेधा चिथडे यांना ‘प्रिसिजन सामाजिक कृतज्ञता पुरस्कार’

सोल्जर्स इंडिपेन्डंट रिहॅबिलिटेशन फाउंडेशन या संस्थेच्या वतीने सियाचेन या जगातील सर्वोच्च रणभूमीवर ऑक्सिजन जनरेशन प्लांट सुरू करून तेथील सैनिक आणि पर्यटकांना जीवनदायी श्वास देण्याचे कार्य श्रीमती सुमेधा चिथडे यांनी केले आहे. तसेच सैनिकांच्या विधवा पत्नी आणि मुलांचे पुनर्वसन करण्याचे त्यांचे कार्य उल्लेखनीय आहे. त्यांच्या या अद्वितीय सेवेसाठी त्यांना ३ लाख रुपयांचा *प्रिसिजन सामाजिक कृतज्ञता पुरस्कार आणि सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.

अधिक कदम यांना ‘सुभाष रावजी शहा स्मृती पुरस्कार’

बॉर्डरलेस वर्ल्ड फाउंडेशन या संस्थेच्या माध्यमातून काश्मीरमधील दहशतवाद, युद्ध आणि अराजकतेमुळे अनाथ झालेल्या मुला-मुलींच्या पुनर्वसनाचे कार्य अधिक कदम यांनी गेल्या ३० वर्षांपासून निष्ठेने केले आहे. कुपवाडा, अनंतनाग, जम्मू अशा संवेदनशील भागांमध्ये शिक्षण, आश्रय आणि रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणारे त्यांचे योगदान विलक्षण आहे. त्यांच्या या सेवाभावी कार्याचा सन्मान म्हणून त्यांना २ लाख रुपये आणि सन्मानचिन्ह असे स्वरूप असलेला *“प्रिसिजन सुभाष रावजी शहा स्मृती पुरस्कार”* प्रदान करण्यात आला.

पुरस्कार सोहळ्यानंतर डॉ. उदय निरगुडकर यांनी सुमेधा चिथडे आणि अधिक कदम यांची संवादात्मक मुलाखत घेतली. “सामाजिक ज्ञान आणि भान जपणे हेच खरे राष्ट्रसेवेचे लक्षण आहे”, “Beyound yourself… Before yourself…”, “देशासाठी कार्य करणारे सैनिक कधीच उठाव किंवा मागण्या करत नाहीत — ते फक्त आपले कर्तव्य पार पाडतात” अशा विचारांनी सुमेधा चिथडे यांनी रसिकांना विचारमंथन करायला भाग पाडले.

अधिक कदम

गेल्या दोन दशकांपासून पूर्ण मुस्लिम व दहशतवादग्रस्त भागात कार्यरत असलेल्या अधिक कदम यांनी सांगितले की, “काश्मिरी पंडित आणि काश्मिरी मुस्लिम यांचा DNA एकच आहे. फरक फक्त धर्माचा आहे, पण माणुसकी तीच आहे.” त्यांनी काश्मिरीयत आणि महाराष्ट्रातील वारकरी संप्रदाय यामधील साम्यही अधोरेखित केले.

“माझ्यावर कधीच इस्लाम धर्म स्वीकारण्याचा दबाव आला नाही,” असे ते म्हणाले. दहशतवाद्यांनी एकूण 19 वेळा त्यांना उचलून नेले, तरीही त्यांनी मानवतेचा मार्ग सोडला नाही. अनेक काश्मिरी मुलींचे शिक्षण पूर्ण करून देणे आणि विवाहाची जबाबदारी उचलणे हे त्यांचे कार्य प्रेरणादायी ठरले आहे.

त्यांच्या संघर्षमय प्रवासातील या अनुभवांनी उपस्थित प्रेक्षक भारावून गेले. “प्रिसिजन गप्पा”च्या या संवादातून सहिष्णुता, शिक्षण आणि मानवतेचा प्रभावी संदेश पोहोचला.

कार्यक्रमाच्या शेवटी विलास कुलकर्णी यांचे अभंग सादरीकरण झाले.अधिक कदम हे उत्तम पखवाजवादक असल्याने विलास कुलकर्णी यांच्या अभंगाला अधिक कदम यांनी पखवाजाची साथसंगत केली.

सामाजिक जबाबदारीची नवी व्याख्या मांडत, सेवाभावी व्यक्तींना सन्मानित करून “प्रिसिजन गप्पा 2025” या वर्षाचा समारोप प्रेरणादायी वातावरणात झाला.

*प्रिसिजन सेवा सन्मानाचे मानकरी*

   1.  सौ. ऋचा पाठक – वृत्तपत्र विक्रेत्या. सोलापूर

   2. श्रीमती. अंबिका पानगंटी- पहिल्या महिला रिक्षाचालक व प्रशिक्षक. सोलापूर

   3. श्री. मोहन तलकोक्कुल – मनोरूग्ण आणि बेघरांसाठी कार्य. सोलापूर

   4. श्री. रामचंद्र वाघमारे – व्यसनमुक्तीसाठी कार्य. सोलापूर

   5. श्री. राहुल बिराजदार – मासिक पाळी संबंधात प्रबोधन. सोलापूर

   6. श्री. अतुल गवळी – महापुरात ४० जणांचा जीव वाचवला. सीना दारफळ, माढा.

   7. श्री. विजयसिंह उबाळे – महापुरात ४० जणांचा जीव वाचवला. सीना दारफळ, माढा.

   8. श्री. कैलास काटकर – सलूनमध्ये वाचनालय सुरू करून वाचन चळवळीला प्रोत्साहन. मोडनिंब, माढा.

   9. श्री. राजू डोलारे – कोरोना काळात ३८०० अंत्यविधी. चित्रकार. सोलापूर.

  10. श्री. संजय बैरागी – स्वतः अंध असून अंधांसाठी विविध कार्य. कुर्डुवाडी, माढा.

Post Views: 29
Previous Post

क्रांतिवीर लहुजी वस्ताद साळवे मध्यवर्ती जयंती उत्सव समिती अध्यक्षपदी खंडू बनसोडे

Next Post

दया हेच खरे आत्मिक सौंदर्य : डॉ. चागंटी कोटेश्वर राव

तरुण भारत

तरुण भारत

Next Post

दया हेच खरे आत्मिक सौंदर्य : डॉ. चागंटी कोटेश्वर राव

ताज्या बातम्या

सिडको येथे माता रमाई आंबेडकर जयंती महोत्सव उत्साहात साजरा

February 7, 2026

माता रमाईस लेझिम पथकाने दिली जयंती दिनी मानवंदना

February 7, 2026

माता रमाबाई यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन कार्यक्रम संपन्न

February 7, 2026

तहसील कार्यालय व परिसरात अनधिकृत दलाल/एजंट यांना सक्त मनाई

February 7, 2026

मरवाळीतांडा आश्रम शाळेत दहावीच्या विद्यार्थ्यांचा भावनिक निरोप समारंभ

February 7, 2026

रस्त्या उंचीकरणामुळे विद्युत तारा तुटण्याचे सत्र सुरू!

February 7, 2026

तहसील कार्यालय व परिसरात अनधिकृत दलाल/एजंट यांना सक्त मनाई.#viral #public #marathinews #marathinews

February 7, 2026

कर्मवीर भाऊरावपाटील महाविद्यालयाच्या 5विद्यार्थी खेळाडूंची राष्ट्रीयस्पर्धेसाठी विद्यापीठ संघात निवड

February 7, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

तरुण भारतचा अंदाज तंतोतंत खरा ठरला; सोलापूरात महापौर-उपमहापौर बिनविरोध

byतरुण भारत
February 7, 2026
0

सोलापूर : दैनिक तरुण भारतने व्यक्त केलेला अंदाज अखेर तंतोतंत खरा ठरला आहे. सोलापूर महापालिकेच्या महापौर आणि उपमहापौर पदाची निवडणूक...

सोलापूरच्या विकासासाठी सर्व प्रश्न मार्गी लावणार : उपाध्यक्ष अण्णासाहेब बनसोडे

byतरुण भारत
February 7, 2026
0

सोलापूर : महाराष्ट्र राज्य विधानसभेचे उपाध्यक्ष  अण्णासाहेब बनसोडे यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष आनंद चंदनशिवे यांनी सदिच्छा भेट घेतली....

महापौर – उपमहापौर निवडीपूर्वी भाजपाची रणनिती ठरली ठोस

byतरुण भारत
February 6, 2026
0

सोलापूर -  महानगरपालिकेच्या महापौर व उपमहापौर निवडणुकीसाठी शुक्रवार, दिनांक ६ फेब्रुवारी रोजी विशेष सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली आहे. ही...

सोलापूर महापालिकेत भाजपाची सत्ता स्थापनेची तयारी अंतिम टप्प्यात; ८७ नगरसेवक गट नोंदणीसाठी पुण्याकडे रवाना

byतरुण भारत
February 1, 2026
0

सोलापूर -  महानगरपालिका निवडणुकीत भारतीय जनता पार्टीने ऐतिहासिक आणि भरघोस यश मिळवत स्पष्ट बहुमताची मजल मारली आहे. या विजयामुळे महापालिकेत...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0664380

वृत्त संग्रह

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories

© Website Design by Digital Buffalo - 9028927697