बार्शी – वैद्यकीय क्षेत्रामध्ये काम करत असताना सामाजिक कर्तव्याचे भान ठेवून बार्शीमध्ये “प्रतिसाद फाउंडेशनची” स्थापना करण्यात आली आहे. या अंतर्गत शालेय विद्यार्थ्यांकरता विविध उपक्रम, समाज उपयोगी कार्य, महिलांसाठी विविध स्पर्धा तसेच मुलांना करिअर मार्गदर्शन असे विविध उपक्रम भविष्यात राबवले जाणार आहेत..
सध्याचे बदलते सामाजिक स्वरुप पाहता वेळोवेळी समाज प्रबोधन पर उपक्रम राबवणार असल्याचे माहिती फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. देविदास इंगळे यांनी दिली.
फाउंडेशनचे अध्यक्ष म्हणून डॉ. देविदास इंगळे, उपाध्यक्ष डॉ. पवन कोळी, सचिव डॉ. विनायक हगरे, सहसचिव डॉ. प्रीतम इंगळे तसेच डॉ. कल्याणी इंगळे, डॉ. क्रांती कोळी डॉ, प्रियंका इंगळे, डॉ. दिपाली हगरे हे संघटनेचे सदस्य असणार आहेत.


















