Sunday, June 14, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

प्रत्येक द्वादशी ही श्री भगवंत प्रकट दिनाइतकीच महत्त्वाची – आमदार दिलीप सोपल

तरुण भारतbyतरुण भारत
May 15, 2026
in editor
0
प्रत्येक द्वादशी ही श्री भगवंत प्रकट दिनाइतकीच महत्त्वाची – आमदार दिलीप सोपल
0
SHARES
9
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

बार्शी – वैशाख कृष्ण द्वादशीनिमित्त गुरुवार दि. १४ मे रोजी बार्शी येथील श्री भगवंत मंदिरात आमदार दिलीप सोपल गटाच्या वतीने भक्तिमय वातावरणात महापूजेचे आयोजन करण्यात आले. विश्वास बारबोले दांपत्य, योगेश सोपल दांपत्य, युवराज काटे दांपत्य, गणेश जाधव दांपत्य तसेच शिंदे दांपत्य यांच्या हस्ते विधीवत महापूजा संपन्न झाली. यावेळी आमदार दिलीप सोपल, आजी-माजी नगरसेवक, पदाधिकारी उपस्थित होते.

बार्शीचे ग्रामदैवत असलेल्या श्री भगवंताचे महात्म्य विशद करताना आमदार दिलीप सोपल म्हणाले की, भक्त राजा अंबरीष यांच्यावर आलेले संकट दूर करण्यासाठी आणि दुर्वास ऋषींच्या शापातून त्यांची मुक्तता करण्यासाठी श्री भगवंत द्वादशीच्या दिवशी बार्शीत प्रकट झाले. त्यामुळे प्रत्येक द्वादशी ही श्री भगवंत प्रकट दिनाइतकीच महत्त्वपूर्ण आहे. या धार्मिक परंपरेचे जतन व्हावे आणि द्वादशीचे महत्त्व समाजापर्यंत पोहचावे यासाठी द्वादशी महापूजेचा नवा उपक्रम सुरु करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

ते पुढे म्हणाले की, वारकरी संप्रदायात पंढरपूरच्या विठ्ठलासाठी एकादशीचे व्रत केले जाते आणि द्वादशीला श्री भगवंताचे दर्शन घेऊन उपवास सोडण्याची वारकरी परंपरा आहे. संत परंपरेतील ही श्रद्धा आणि अध्यात्मिक वारसा पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचावा, या उद्देशाने द्वादशी महापूजेची सुरुवात करण्यात येत आहे.

देशासमोरील सध्याच्या परिस्थितीचा उल्लेख करताना आमदार सोपल यांनी सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पेट्रोल-डिझेल बचत, खाद्यतेलाचा संयमी वापर आणि अनावश्यक सोने खरेदी टाळण्याचे केलेले आवाहन लक्षात घेऊन सर्वांनी देशहितासाठी सहकार्य करणे आवश्यक आहे. देशावरील संकट लवकर दूर होऊन नागरिकांच्या जीवनात सुख, समृद्धी आणि आनंद नांदो, अशी प्रार्थना श्री भगवंत चरणी करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

भविष्यात पेट्रोल-डिझेल, गॅस आदींच्या संभाव्य तुटवड्याचा फटका बार्शीकरांना बसू नये, यासाठी तहसीलदार एफ. आर. शेख यांच्याशी चर्चा करुन शहर व तालुक्यातील इंधन आणि गॅस पुरवठ्याचा आढावा घेतल्याचेही त्यांनी सांगितले. नागरिकांना कमीत कमी अडचणींचा सामना करावा लागावा, यासाठी महसूल विभाग आणि वितरण प्रणालीला योग्य नियोजनाच्या सूचना देण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

महापूजेनंतर श्री भगवान देवस्थानच्यावतीने आमदार दिलीप सोपल तसेच महापूजेस उपस्थित सर्व दांपत्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी देवस्थान समितीचे सरपंच दादासाहेब बुडूख, मुकुंदशेठ कुलकर्णी, सोमाणी भाऊ, नाना सुरवसे, माजी उपनगराध्यक्ष आबाजी पवार, कृष्णराज बारबोले, प्रा.किरण देशमुख, अंबादास शिंदे, नंदकुमार काशीद, मनिष चौहान, शंकर देवकर तसेच सोपल गटाचे आजी-माजी नगरसेवक व पदाधिकारी उपस्थित होते.

Post Views: 26
Previous Post

‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान’ अंतर्गत बार्शीतील विकासकामांचे कंधार पथकाकडून परीक्षण

Next Post

वैरागमध्ये धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती उत्साहात साजरी

तरुण भारत

तरुण भारत

Next Post
वैरागमध्ये धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती उत्साहात साजरी

वैरागमध्ये धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती उत्साहात साजरी

ताज्या बातम्या

१०.४६ लाखांच्या भेसळयुक्त खतप्रकरणी गुन्हा

June 13, 2026

दोन कारची समोरासमोर धडक ; एकाचा जागीच मृत्यू तर पाच जण किरकोळ जखमी

June 13, 2026
म्हशीच्या दुधात जर्शी गायीचे दुध भेसळ करण्याचे प्रमाण वाढले

म्हशीच्या दुधात जर्शी गायीचे दुध भेसळ करण्याचे प्रमाण वाढले

June 13, 2026
“इंग्रजांविरुद्ध आमचा बाप लढला; आमच्या नशिबी मात्र गुन्हेगारीचा कलंक लागला” – डॉ. अरुण जाधव

“इंग्रजांविरुद्ध आमचा बाप लढला; आमच्या नशिबी मात्र गुन्हेगारीचा कलंक लागला” – डॉ. अरुण जाधव

June 13, 2026

भररस्त्यात महिलेच्या गळ्यातील २ तोळे सोन्याचे गंठण लंपास

June 13, 2026
क्रिकेट स्पर्धा पत्रकारांना मानसिक, शारीरिकदृष्ट्या ऊर्जादायी : किरण साळी

क्रिकेट स्पर्धा पत्रकारांना मानसिक, शारीरिकदृष्ट्या ऊर्जादायी : किरण साळी

June 13, 2026
कन्हेरगावच्या वाड्या-वस्तीवरील वीजप्रश्नावर आमरण उपोषणाचा इशारा

कन्हेरगावच्या वाड्या-वस्तीवरील वीजप्रश्नावर आमरण उपोषणाचा इशारा

June 13, 2026
शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी रोहित पवारांचे अन्नत्याग आंदोलन; भीमानगर चौकात जंगी सत्कार

शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी रोहित पवारांचे अन्नत्याग आंदोलन; भीमानगर चौकात जंगी सत्कार

June 13, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

राजेंद्र राऊत हे संघर्षातून घडलेले नेतृत्व-माजी आ.शहाजीबापू पाटील

राजेंद्र राऊत हे संघर्षातून घडलेले नेतृत्व-माजी आ.शहाजीबापू पाटील

byतरुण भारत
June 12, 2026
0

सांगोला -    राजेंद्र राऊत हे संघर्षातून घडलेले नेतृत्व आहे. त्यांचा विजय उमेदवारी जाहीर झाल्याच दिवशी निश्चित झाला असून आता केवळ...

सोलापुरात राजकीय ‘गेमचेंजर’ बैठक ; पवार गटाचे तीन आमदार महायुतीच्या दालनात !

byतरुण भारत
June 11, 2026
0

सोलापूर - विधान परिषद निवडणुकीच्या तोंडावर सोलापूरच्या राजकारणात अनपेक्षित घडामोडींना वेग आला असून, बालाजी सरोवर येथे झालेल्या एका बैठकीने नव्या राजकीय...

फॅबटेक मुळे सांगोल्याची शैक्षणिक पताका राज्यभर-ना.जयकुमार गोरे

फॅबटेक मुळे सांगोल्याची शैक्षणिक पताका राज्यभर-ना.जयकुमार गोरे

byतरुण भारत
June 10, 2026
0

सांगोला -  ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण आणि रोजगाराभिमुख शिक्षण देत फॅबटेक टेक्निकल कॅम्पसने सांगोल्याला राज्याच्या शैक्षणिक नकाशावर ठळक स्थान मिळवून...

उमेदवार राजेंद्र राऊत यांनी घेतली महापौर विनायक कोंड्याल यांची सदिच्छा भेट

उमेदवार राजेंद्र राऊत यांनी घेतली महापौर विनायक कोंड्याल यांची सदिच्छा भेट

byतरुण भारत
June 9, 2026
0

सोलापूर : भाजप- महायुतीचे विधान परिषद निवडणुकीचे उमेदवार राजेंद्र राऊत यांनी सोमवारी महापौर विनायक कोंड्याल यांची महापौर निवासस्थानी सदिच्छा भेट...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0908770

वृत्त संग्रह

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697