सोलापूर – सोलापूर जिल्ह्यातील सर्व माजी सैनिकांना कळविण्यात येते की, जे माजी सैनिक दिनांक ०१ जानेवारी १९८६ पूर्वी सेवानिवृत्त झाले आहेत व त्यांच्या पत्नीचे नाव पीपीओमध्ये नमूद नसल्यास त्यांनी पत्नीचे नाव पीपीओमध्ये समाविष्ट करून घेण्यासाठी आवश्यक कागदपत्रांसह दिनांक १६ जून २०२६ रोजी सकाळी ११.०० वाजता जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय येथे उपस्थित राहावे.
त्यासाठी खालील कागदपत्रे सोबत आणणे आवश्यक आहे :
१) डिस्चार्ज बुक व पीपीओची प्रत.
२) पत्नीचे आधार कार्ड व पॅन कार्ड प्रत.
३) माजी सैनिक ओळखपत्र.
माजी सैनिकांनी सदर प्रक्रिया वेळेत पूर्ण न केल्यास त्यांच्या पश्चात पत्नीला कुटुंब निवृत्ती वेतन मिळण्यास अडचणी निर्माण होऊ शकतात. त्यामुळे सर्व संबंधित माजी सैनिकांनी आवश्यक कागदपत्रांसह दिलेल्या दिनांक व वेळेत उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, सोलापूर यांनी केले आहे.


















