बार्शी – मागील खरीपामध्ये जमिनी खरडून जाणारा प्रचंड पाऊस होऊन देखील सॅटॅलाइटच्या चुकीच्या सर्वेमुळे शेतकऱ्यावर अन्याय होत असल्यामुळे हा सर्वे तात्काळ रद्द करुन एस.डी.आर. एफ. आणि एन. डी. आर. एफ. निकषाच्या आधारे खरीप २०२५ चा पीक विमा द्या, पीक विम्यातून वगळलेले ४ ट्रिगर पुन्हा घ्या, आजपर्यंतचा लुटलेला सर्व पीक विमा तात्काळ द्या, पीक विम्याचे राज्यप्रमुख विनयकुमार आवटे यांचेसह सर्व पीक विमा कंपन्यांची स्थापनेपासून संपत्तीची न्यायालयीन चौकशी करा आदी मागण्यासाठी बार्शी ते धाराशिव रस्त्यावरील चिखर्डे येथील बस स्थानकावर शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष शंकर गायकवाड यांचे नेतृत्वाखाली रस्ता रोको आंदोलन करण्यात आले, यावेळी गायकवाड यांनी वरील मागणीची पूर्तता लवकरात लवकर न झाल्यास मंत्रालयावर आंदोलन करणार असल्याचा इशारा यावेळी दिला, गायकवाड यांचे बरोबरच शरद भालेकर, रामभाऊ काटे आदींनीही आपले मनोगत व्यक्त केले. त्यावेळी गुलाब लोखंडे, मोहन कोंढारे, अण्णासाहेब कोंढारे, रघुनाथ कोंढारे, राहुल कोंढारे, अमर कोंढारे, लक्ष्मण भोसले, सुधीर सवणे, राजीव कोंढारे, सचिन नाटेकर, ज्ञानेश्वर पाचकवडे, औदुंबर कोंढारे, वैभव जाधव, नबीलाल शेख, सनी मोरे, योगेश कोंढारे, बालाजी मोरे, प्रज्वल कोंढारे, नानासाहेब हंडीबाग, हरी पाचकवडे, जगन्नाथ कोंढारे, संदीप कोंढारे, प्रकाश कोंढारे, जगन्नाथ मोदी, सुरज कोंढारे, तात्यासाहेब गलांडे, बाजीराव बदाले, संजय कोंढारे, शुभम क्षीरसागर, संकेत पाचकवडे, प्रथमेश मोरे, अक्षय कोंढारे, आदित्य कोंढारे, लक्ष्मण मोहिते, आदित्य जाधव, अभिषेक गवळी, मारुती डुकरे आदींसह पंचक्रोशीतील बहुसंख्य शेतकरी उपस्थित होते. आंदोलनाचा चोख पोलीस बंदोबस्त पांगरी पोलीस ठाण्याचे श्री. माने व त्यांच्या कर्मचाऱ्यांनी ठेवला होता.