बार्शी – जामगाव (आ) ता. बार्शी येथे, बार्शी-लातूर रस्त्यावर शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष शंकर गायकवाड यांचे नेतृत्वाखाली सुमारे एक तास शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी रस्ता रोको आंदोलन करण्यात आले.
दुष्काळ जाहीर करुन मागील वर्षी वगळलेले महत्त्वाचे ट्रिगर पुन्हा लागू करा, स्मार्ट मीटर बसवणे बंद करा अन्यथा शेतातील विद्युत खांब व डीपीचे आजपर्यंतचे भाडे द्या, उजनी कॅनॉलच्या पाण्याने अर्धा किलोमीटर अंतरातील तीन धरणे भरा, बायपासपासून पुढे फक्त सात मीटर संपादन असल्यामुळे मोबदला वाढवून द्या, पीक विमा कंपन्यांची त्यांच्या स्थापनेपासून तर राज्य प्रमुख विनयकुमार आवटे आणि आजपर्यंतच्या सर्व कृषी आयुक्तांची यांच्या संपत्तीची न्यायालयीन चौकशी करा, चालू खरिपाची नुकसान भरपाई व मागील आणि चालूचा पीक विमा द्या इत्यादी मागण्यासाठी हे आंदोलन केले असल्याचे त्यांनी यावेळी सांगून मागण्याची पूर्तता लवकरच न झाल्यास संबंधित मंत्र्याच्या घरावर आंदोलन करणार असल्याचा इशारा गायकवाड यांनी यावेळी दिला.
त्यावेळी यशवंत गडदे, भाऊसाहेब आवटे, बिभीषण जोडवे, श्रीहरी यादव, विजय आवटे, अशोक ठोंबरे, संजय गात, पंकज आवटे, विलास लुंगसे, उमेश काळे, बालाजी कागदे, सर्वदमन आवटे, नंदकुमार आवटे, बंडू कुटे, शंकर कागदे, अविनाश अंधारे, अमोल जाधव, वसंत जाधव, चंद्रकांत गडदे, रामेश्वर काळे, गणेश कागदे, मारुती आवटे, शरद आवटे, विलास पवार, पंडित गडदे, समाधान कागदे, रावण आवटे, भरत आवटे, बाळु कुटे, अभिमान गडदे, नाना कागदे, शंकर गडदे, विकास लुगसे, नारायण आवटे, कैलास आवटे, मदन ठोंबरे, रणजित नाईकनवरे, भगवान नाईकनवरे, विष्णू काळे, शहाजी लुगसे, नागेश आवटे, अमोल आवटे, अर्जुन जाधव, उध्दव गडदे, सतोष आवटे, संतोष मिटकरी, विक्रम बिवलकर, राम भुईभार, गणेश गडदे, सचिन घडले आदींसह पंचक्रोशीतील बहुसंख्य शेतकरी उपस्थित होते. आंदोलकांचे निवेदन तहसीलचे प्रतिनिधी औदुंबर शिंदे यांनी स्वीकारले तर या आंदोलनाचा चोख पोलीस बंदोबस्त बार्शी तालुका पोलीस स्टेशनचे पीएसआय सदाशिव गवळी व त्यांच्या सहकाऱ्यांनी ठेवला होता.
Post Views: 13