सोलापूर : सोलापूर महानगरपालिका शाळांमधील शिक्षक हे इतर शिक्षकांच्या तुलनेत अधिक परिश्रम घेत आहेत.
मनपा शिक्षकांनी विद्यार्थ्यांमध्ये केवळ शैक्षणिक ज्ञानच नव्हे, तर संस्कार, कौशल्ये आणि जीवनमूल्ये रुजवून सर्वगुणसंपन्न विद्यार्थी घडवावेत, असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय शिक्षक संघटनेचे राज्याध्यक्ष शामराव जवंजाळ यांनी केले.
सोलापूर महानगरपालिका प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेच्या वतीने शिक्षक दिनानिमित्त आयोजित उपक्रमशील शिक्षक पुरस्कार वितरण सोहळा समाजकल्याण केंद्राच्या रंगभवन येथे झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शामराव जवंजाळ होते. प्रमुख पाहुणे म्हणून सोलापूर जिल्हाध्यक्ष शशिकांत खुडे तसेच मनपा उर्दू टीचर्स प्रायमरीचे अध्यक्ष फजल अहमद शेख उपस्थित होते.यावेळी सोलापूर महानगरपालिकेच्या मराठी, कन्नड, उर्दू आणि तेलुगू माध्यमातील कार्यरत ११ उपक्रमशील शिक्षकांचा जवंजाळ यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. पुरस्काराचे स्वरूप शाल, सन्मानचिन्ह, गौरवपत्र आणि चांदीच्या मूर्तीची फ्रेम असे होते. प्रास्ताविक पतसंस्थेचे चेअरमन नागेश गोसावी यांनी केले. सूत्रसंचालन संचालक गंगाधर कांबळे व तज्ज्ञ संचालिका स्नेहा पुजारी यांनी केले. स्वाती शिंदे यांनी आभार मानले.
यावेळी व्हाईस चेअरमन जहारा नगदेकर, संचालक गंगाधर कांबळे, स्वाती शिंदे, कृष्ण परमेश्वर सुतार, इम्रान जमादार, अफरोज बागवान, मुद्देसर पाशा पिरजादे, शाहीन शेख, केशव गलगली, भास्कर मदनाल, तज्ज्ञ संचालिका स्नेहा पुजारी, व्यवस्थापक समर्थ जाधव, लिपिक शाकीर शेख यांच्यासह महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय शिक्षक संघटना, उर्दू टीचर्स फेडरेशन व मनपा शिक्षक संघाचे पदाधिकारी उपस्थित होते.
या ११ शिक्षकांचा झाला गौरव
अप्पासाहेब चंद्रकांत ककमारे,रियाज बिलाल नदाफ, हनुमंत कुंडलिक लंगोटे , दुर्गादेवी गणेश जंजिराल, शिरीन सलामतुल्ला शेख, विठ्ठल सत्यप्पा वाघमोडे, कल्पना व्यंकटेश कुरापाटी , तहसीन सोहेल शेख, शबाना परवीन सोहेल जमादार, महेबूबबी मुश्ताक अहमद शेख,
इम्रान हुसेन मोहम्मद इसाक सौराज आदी शिक्षकाचा सन्मान करण्यात आला.
Post Views: 15