अक्कलकोट – सज्जन भक्तांचे परिपालन आणि दुष्टांच्या विनाशाकरीता प्रत्येक युगात धर्मरक्षणासाठी वेगवेगळ्या रूपातून भगवंत अवतार धारण करतात असे निरुपण येथील कीर्तनकार ह.भ.प.शाहू महाराज माने यांनी केले. ते श्रीकृष्ण जन्माष्टमी व गोपाळकाल्या निमीत्त श्री.वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानच्या वतीने देवस्थानच्या ज्योतीबा मंडपात आयोजीत करण्यात आलेल्या कीर्तन सेवेत आपल्या ओजस्वी, हृदयस्पर्शी कीर्तनातून भगवान श्रीकृष्णाच्या जन्माचा दिव्य प्रसंग कथन केला. यामध्यमातून कीर्तनकार ह.भ.प.शाहू महाराज माने यांनी निरुपण केले.
कीर्तन सेवेच्या प्रारंभी मंदीर समितीच्या वतीने समितीचे चेअरमन महेश इंगळे यांनी ह.भ.प.शाहू महाराज माने यांचा श्री स्वामी समर्थांचे कृपावस्त्र, प्रसाद, प्रतिमा देवून यथोचित सन्मान केला. पुढे कीर्तनाच्या पूर्वरंगात ह.भ.प. शाहू महाराज माने यांनी संत तुकाराम महाराजांच्या “धर्म रक्षावया अवतार घेसी। आपुल्या पाळीसी भक्तजना” या अभंगाचे सखोल निरूपण करून उपस्थित श्रोत्यांना भक्ती भावाच्या गंगेत डुबकीचा प्रत्यय दिला. या प्रसंगी अम्बरीष राजाचा दृष्टांत देत त्यांनी हे स्पष्ट केले की, भक्तांचा अपमान सहन न करता स्वतः श्रीविष्णूने सुदर्शन चक्राद्वारे दुर्वासा ऋषींनाही धडा शिकवला. त्यामुळे भगवंत भक्तांच्या रक्षणासाठी सदैव सज्ज असतात, हे या प्रसंगातून अधोरेखित होते. उत्तररंगात भगवान प्रभू गोपाल कृष्णांचा जन्मोत्सव उत्कटतेने मांडला. कारागृहातील देवकी-वासुदेव प्रसंग, श्रीकृष्णाचा चमत्कारिक जन्म, नंदगावातील आनंदोत्सव या घटनांचे प्रभावी वर्णन करून उपस्थित श्रोत्यांच्या डोळ्यांत पाणी आणले. “जय श्रीकृष्ण”च्या घोषात संपूर्ण मंडप दुमदुमला आणि भक्तगण आनंदोत्सवात रंगून गेले. आज गोपाळकाल्यानिमीत्त
सदगुरुंच्या कृपेनेच जीवन परिपूर्ण होवून आपलं जीवन इतरांसाठी प्रसादरुप बनतं यालाच गोपाळकाला म्हणतात, म्हणून आपले जीवन इतरांसाठी गोपाळ काल्याचा प्रसाद बनावा असेही निरुपण
ह.भ.प.शाहू महाराज माने यांनी केले.
या कीर्तनाला हार्मोनियमची मधुर साथ
श्रीमंत पांचाळ, मृदंग साथ पवन जावळे, साथीदार कोंडीराम पांचाळ, शिवाजी रोंगे भाग्यशाला पांचाळ, दिनकर पांचाळ,
रवी मुळे, सुनामी पांचाळ, आनंद पांचाळ, आबासाहेब गोडसे यांनी दिली. यामुळे कीर्तनाचे सौंदर्य अधिक खुलले आणि श्रोत्यांनी संगीत व भक्तीचा सुरेख संगम अनुभवला.
जन्माष्टमीदिनी मंदीर समितीचे प्रमुख महेश इंगळे यांच्या मार्गदर्शना खाली प्रथमेश इंगळे यांच्या प्रमुख उपस्थितीत देवस्थानच्या ए.वन चौक येथील विठ्ठल मंदीरात रात्री ९ ते १२ या वेळेत देवस्थानच्या विश्वस्ता उज्वलाताई सरदेशमुख यांच्या अधिपत्याखाली कौसल्या जाजू, निंगूताई हिंडोळे, इंदूमती जंगाले, उर्मिला शिंदे, नलिनी ग्रामोपाध्ये, लक्ष्मी पाटील, विजया सुतार, कल्पना सलबते, रेखा सुरवसे, राणी बिराजदार, आरती काळे, वासंती जाजू, स्वाती पाठक, अक्षय सरदेशमुख, बाळू घाटगे, पिंटू हिंडोळे आदींसह सत्संग महिला भजनी मंडळाच्या वतीने भजन व त्यानंतर गुलाल पुष्प वाहुन, पाळणा गीत व प्रथमेश इंगळे यांच्या हस्ते आरती करुन मोठ्या भक्तीभावाने श्रीकृष्णांचा जन्मोत्सव साजरा करण्यात आला.
आज गोपाळकाला रोजी सकाळी १० ते १२ या वेळेत काल्याचे कीर्तन व त्यानंतर श्री विठ्ठल मंदीर व देवस्थानच्या ज्योतीबा मंडपात दहीहंडी फोडून गोकुळ अष्टमी उत्सवाची सांगता झाली. यावेळी विश्वस्त मंडळाचे चेअरमन महेश इंगळे, सचिव आत्माराम घाटगे, विश्वस्त महेश गोगी, श्रीशैल गवंडी, गिरीश पवार, समर्थ स्वामी, संजय मोरे, रविराव महींद्रकर, मनोज जाधव, विपूल जाधव आदींसह भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.
फोटो ओळ – श्रीकृष्ण जन्माष्टमी निमीत्त विठ्ठल मंदीरात पाळणा आरती करताना प्रथमेश इंगळे, विश्वस्ता उज्वलाताई सरदेशमुख व अन्य दिसत आहेत.
Post Views: 16