सोलापूर – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित ‘सेवा सप्ताहा’अंतर्गत भाजप ओबीसी मोर्चा (सोलापूर पूर्व)यांच्या वतीने कारंबा येथे अंगणवाडी सेविका व ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार तसेच आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरात तब्बल २१० नागरिकांची रक्तदाब (बीपी) व रक्तातील साखरेची (शुगर) तपासणी करण्यात आली.
यावेळी संभाजी दडे, विनायक सुतार, भगवान सुतार, अंबादास गायकवाड, नागनाथ पाटील, शहाजी गायकवाड, अकबर पटेल, सत्तारभाई शेख, राहुल मस्के, अमोल सुतार, संजय आदाटे, मशाक शेख यांच्यासह अंगणवाडी सेविका, ज्येष्ठ नागरिक व ग्रामस्थ उपस्थित होते.
आरोग्य विभागाच्या वतीने नागरिकांची तपासणी करून आरोग्यविषयक सेवा दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय आदाटे, प्रास्ताविक विनायक सुतार, तर आभार अमोल सुतार यांनी मानले.
### चौकट :
सेवा सप्ताहातून सामाजिक बांधिलकीचा संदेश
ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान आणि नागरिकांच्या आरोग्याची तपासणी अशा उपक्रमातून समाजातील विविध घटकांप्रती असलेली सामाजिक बांधिलकी जपण्याचा प्रयत्न करण्यात आला.
Post Views: 18