पंढरपूर – पंचायत समिती पंढरपूर येथील शेतकी भवन सभागृहामध्ये ४ वर्षानंत्तर पहिली मासिक सर्वसाधारण सभा सोमवारी (दि.६) सभापती डॉ.शुभम आगावणे यांच्या अध्यक्षतेखाली व उपसभापती प्रमोद हरीभाऊ देशमुख तसेच सचिव गट विकास अधिकारी अमोल जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत घेण्यात आली.
या सभेस पंचायत समिती सदस्य शहाजी मुळे, राहुल पुरवत, पुनम पवार, महादेव जाधव, विजया भोसले, सावली गायकवाड, ज्योती पांढरे, रंजना शिंदे, निखिल गोसावी, प्रमिला झांबरे, विजय शिंदे, आक्काबाई लोखंडे, वंदना फाटे, प्रियांका जाधव उपस्थित होते.
दरम्यान सभेमध्ये राज्य शासनाकडील व पंचायत समिती कडील सर्व विभागाचा कामकाजाचा आढावा घेण्यात आला. त्यावेळी ज्या विभागाचे काम असमाधानकारक आहे त्यांना त्या कामामध्ये सुधारणा करण्याच्या सुचना देण्यात आल्या. तसेच जे राज्य शासनाचे खातेप्रमुख सभेस गैरहजर होते. त्यांच्या बाबतीत पुढील मासिक सभा त्यांच्या कार्यालयात जाऊन घेण्याच्या सुचना उपसभापती प्रमोद देशमुख यांनी दिल्या.
या सभेचे कामकाज सहाय्यक प्रशासन अधिकारी शहाजहान तांबोळी, वरिष्ठ सहाय्यक महेश वैद्य, कनिष्ठ सहाय्यक प्रशांत हिल्लाल यांनी पाहिले.


















