सोलापूर : सांस्कृतिक कार्य विभाग, सांस्कृतिक कार्य संचालनालय महाराष्ट्र राज्य आणि समरसता साहित्य परिषद यांच्या संयक्त विद्यमाने रविवार दि. २८ जून २०२६ रोजी बालगंधर्व रंगमंदिर, शिवाजीनगर, पुणे येथे लोककला संमेलन आयोजित करण्यात आले आहे.
या संमेलनाचे उद्घाटन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शुभहस्ते होणार असून, केंद्रीय नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री श्रीमती सुनेत्रा अजित पवार यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.
संमेलनाध्यक्ष म्हणून, पद्मश्री पुरस्काराने सन्मानित रघुवीर खेडकर मार्गदर्शन करणार आहेत. सकाळी लोककला दिंडीने संमेलनाची सुरुवात होणार असून, त्यानंतर दुर्मिळ लोकवाद्यांचे प्रदर्शन, पारंपरिक लोककला दर्शन, कवीसंमेलन, चर्चासत्र आणि दुपारनंतर विविध मुलाखतींचे आयोजन करण्यात आले असून, लोककलांचा भव्य सांस्कृतिक कार्यक्रम सादर होणार आहे.
यामध्ये गोधळी, वासुदेव, वाघ्या मुरळी, भारूड, शाहिरी, लावणी, दशावतार, आदिवासी नृत्य, डीपी यांसह महाराष्ट्रातील झाडापडा यासह महाराष्ट्राताल विविध लोककला प्रकारांचा समावेश राहणार आहे. लोककला क्षेत्रातील नामवंत कलाकार, साहित्यिक, संशोधक आणि राज्यभरातील लोककलावंत या संमेलनात सहभागी होणार असून, महाराष्ट्राच्या समृद्ध लोकपरंपरेचे दर्शन घडणार आहे. लोककला संवर्धन, जतन आणि नव्या पिढीपर्यंत ती पोहोचविण्याच्या उद्देशाने हे संमेलन आयोजित करण्यात आले आहे. समेलनात सहभागी होण्यासाठी सोलापूर जिल्ह्यातील लोककलावंत व साहित्यप्रेमी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हा संयोजक शाहीर सुभाष गोरे व शाहीर रमेश खाडे यांनी केले आहे.