बार्शी – लायन्स क्लब बार्शी रॉयल, भगवंत नेत्रालय, ग्रामपंचायत उंडेगाव व न्यू इंग्लिश स्कूल उंडेगाव यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळवार, दि. ६ ऑक्टोबर रोजी ग्रामपंचायत कार्यालय, उंडेगाव येथे मोफत नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले.
या शिबिरात लहान मुलांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत एकूण ९३ नागरिकांची नेत्र तपासणी करण्यात आली. नागरिकांच्या डोळ्यांची तपासणी करुन दृष्टीदोष तसेच डोळ्यांशी संबंधित तक्रारींबाबत आवश्यक मार्गदर्शन करण्यात आले. गरजेनुसार पुढील उपचाराबाबतही सल्ला देण्यात आला.
यावेळी लायन्स क्लब बार्शी रॉयलचे माजी अध्यक्ष ला. राजेश खाडे, सेक्रेटरी ला. दयानंद रेवडकर, खजिनदार ला. उमेश जाधव तसेच प्रोजेक्ट चेअरमन ला. मनीष रुगले उपस्थित होते.
ग्रामीण भागातील नागरिकांना त्यांच्या गावातच मोफत नेत्र तपासणीची सुविधा उपलब्ध करून दिल्याबद्दल ग्रामस्थांनी लायन्स क्लब बार्शी रॉयल व सर्व आयोजकांचे कौतुक केले.
Post Views: 17