श्रीपूर – महाळुंग – श्रीपूर येथिल भारतीय जनता पार्टी चे विक्रमसिंह लाटे यांची माढा तालुका पश्चिम मंडल सरचिटणीस पदी नियुक्ती करण्यात आली असल्याचे पत्र भाजपा माढा तालुका अध्यक्ष योगेश बोबडे यांनी दिले आहे . सद्द स्थितीत विक्रमसिंह लाटे यांच्या पत्नी तेजश्री लाटे या महाळुंग – श्रीपूर नगरपंचायतीच्या नगरसेविका म्हणून काम पाहत आहेत . या माध्यमातून त्यांनी अनेक विकास कामां करिता निधी आणला आहे . आज त्यांचे पती विकमसिंह लाटे यांना सरचिटणीस म्हणून पक्षाने जबाबदारी दिली आहे . या निवडीने पक्षाचे काम वाढणेस मदत होणार आहे .
महाळुंग – श्रीपूर परिसराचा विचार करता या भागात भाजपाला मानणारा मोठा मतदार वर्ग आहे . याची प्रचिती म्हणजे भाजपा तर्फे प्रथम अँड. दत्तात्रय मुंडकणे दोन वेळा व नंतर अनिल सज्जन जाधव हे मोठ्या मताधिक्याने पंचायत समिती वर निवडून गेले होते . आता नगरपंचायत झाल्याने हे पद रद्द झाले आहे . असे असले तरी या परिसरात भाजपाची पक्ष बांधणी नव्हती . आता चित्र बदलले आहे . माढ्याले जिल्हा दूध संघाचे अध्यक्ष तथा भाजपाचे नेते रणजितसिंह शिन्दे यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी कॉंग्रेसने गत महाळुंग – श्रीपूर नगरपंचायती मध्ये राहूल रेडे – पाटील यांनी ६ जागा मिळवत कडवी लढत देवून विजय मिळवला होता . आता हे सर्व भाजपात आल्याने भाजपाने विक्रमसिंह लाटे यांना सरचिटणीस पदाची संधी देवून या माध्यमातून पक्ष बांधणी करण्याचे ठरवलेले दिसून येते . त्याला कारणही तसेच आहे . मागील निवडणुकीत भाजपाने अनिल जाधव यांच्या माध्यमातून १७ जागा लढवल्या होत्या परंतू पक्षाला दारुण पराभवाला सामोरे जावे लागले पक्षाचे एकमेव प्रकाश नवगिरे निवडून आले होते .
आता चार महिन्यात नगरपंचायतीची पंचवार्षिक निवडणुक होत आहे . त्या पार्श्वभूमिवर ही पक्ष बांधणी होत आहे असे दिसून येते .
विक्रमसिंह लाटे यांच्या निवडीचे अनेकांनी स्वागत करून अभिनंदन केले .
यावेळी विक्रमसिंह लाटे यांनी या भागात भाजपाची ताकद वाढविणे तसेच पक्षाची ध्येय धोरणे प्रत्येक मतदारां पर्यंत पोहोचवणार असल्याचे सांगितले .
Post Views: 19