सांगोला – गणेश उत्सवातील अनावश्यक खर्चाला फाटा देत त्यातून समाजोपयोगी उपक्रम राबविण्याचा आदर्श नृसिंह गणेश तरुण मंडळ, लोहार गल्ली, सांगोला यांनी यंदा घालून दिला आहे. गणरायाच्या आगमनाच्या निमित्ताने नव्याने सुरू होत असलेल्या बगीच्याजवळ वृक्षारोपण करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला. मंडळाचे कार्यकर्ते ॲड.शिवनाथ भस्मे यांच्या संकल्पनेतून हा वृक्षारोपणाचा उपक्रम राबविण्यात आला. या वृक्षारोपणाचा शुभारंभ नगराध्यक्ष आनंदा माने, विजूकाका मस्के व लोहार गल्लीतील लहान मुलींसह महिलांच्या शुभहस्ते करण्यात आला. वृक्ष लावणे एवढ्यावरच न थांबता त्यांचे संगोपन व संवर्धन करण्याची जबाबदारीही घेण्याचा मंडळाने मानस व्यक्त केला. गणेशोत्सवाच्या निमित्ताने अनावश्यक खर्चाला फाटा देत वृक्षारोपणासारखा पर्यावरणपूरक उपक्रम राबविणे ही निश्चितच कौतुकाची बाब असल्याचे मनोगत आनंदा माने यांनी यावेळी व्यक्त केले.
Post Views: 9