Saturday, September 26, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

‘गणपती बाप्पा मोरया… पुढच्या वर्षी लवकर या’च्या जयघोषात गणपती बाप्पाला भावपूर्ण निरोप

तरुण भारतbyतरुण भारत
September 26, 2026
in west maharashtra
0
‘गणपती बाप्पा मोरया… पुढच्या वर्षी लवकर या’च्या जयघोषात गणपती बाप्पाला भावपूर्ण निरोप
0
SHARES
3
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
पंढरपूर – ‘गणपती बाप्पा मोरया… पुढच्या वर्षी लवकर या’च्या जयघोषात आणि पारंपरिक ढोल-ताशा, लेझीमच्या तालावर पंढरपूर शहरासह परिसरातील घरगुती व सार्वजनिक गणेश मंडळांनी लाडक्या गणरायाला भावपूर्ण निरोप दिला. यंदा गणेशोत्सवाचा कालावधी बारा दिवसांचा असल्याने गेल्या काही दिवसांपासून शहरात सुरू असलेल्या उत्साहाला अनंत चतुर्दशीच्या दिवशी भक्तिमय वातावरणात विराम मिळाला.
घरगुती गणेशमूर्तीं बरोबरच विविध सार्वजनिक गणेश मंडळांनी आकर्षक सजावट, पारंपरिक वाद्ये, ढोल-ताशा पथके आणि लेझीम पथकांसह विसर्जन मिरवणुका काढल्या. अनेक मंडळांच्या मिरवणुकांमध्ये तरुणांसह महिला वर्गानेही मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला. विशेषतः महिलांच्या ढोल पथकांनी उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. ढोल-ताशांच्या गजरात आणि लेझीमच्या तालावर गणेशभक्तांनी जल्लोष करत गणरायाला निरोप दिला.
——————
चौकट : ( छत्रपती शिवाजी चौकात गणेश मंडळांचे स्वागत )
पंढरपूर शहरातील छत्रपती शिवाजी चौकात तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या वतीने तसेच विविध नेते व पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत गणेश मंडळांचे स्वागत करण्यात आले. यावेळी नगराध्यक्षा डाँ.प्रणिता भालके, अनिल सावंत, दिलीप धोत्रे यांच्यासह नगरसेवक व विविध पदाधिकारी उपस्थित होते. आमदार समाधान आवताडे यांच्या वतीनेही गणेश मंडळे आणि गणेश भक्तांचे स्वागत करण्यात आले. चौफाळा परिसरात मध्यवर्ती गणेश मंडळाच्या वतीनेही गणेश मंडळांचे स्वागत करण्यात आले. माजी आमदार प्रशांत परिचारक यांच्या वतीने विविध गणेश मंडळांचे स्वागत करण्यात आले. त्यामुळे विसर्जन मिरवणुकी दरम्यान शहरातील प्रमुख चौकांमध्ये भक्तिमय आणि उत्साहपूर्ण वातावरण निर्माण झाले होते.
——————
चौकट : ( महिलांची ढोल पथक ठरली आकर्षण )
यंदाच्या विसर्जन मिरवणुकीत पारंपरिक लेझीम आणि ढोल-ताशा पथकांचा मोठ्या प्रमाणात सहभाग दिसून आला. विशेषतः महिला ढोल पथकांनी आपल्या सादरीकरणातून उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. अनेक मंडळांनी पारंपरिक वेशभूषेत लेझीम सादरीकरण केले. काही गणेश मंडळांनी सामाजिक संदेश देणारी पथनाट्येही सादर केली. अनेक मंडळांकडून विविध विषयांवर सजीव देखावे देखील सादर करण्यात आले. त्यामुळे केवळ मनोरंजन न करता सामाजिक प्रबोधनाचा संदेशही मिरवणुकांमधून देण्यात आला. शहरातील प्रमुख रस्त्यांवर गणेशभक्तांची मोठी गर्दी झाली होती.
——————
चौकट : ( पोलिसांचा चोख बंदोबस्त )
विसर्जन मिरवणुका शांततेत आणि सुरळीत पार पडाव्यात यासाठी पोलिस प्रशासनाच्या वतीने शहरातील प्रमुख चौक व संवेदनशील ठिकाणी चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. मिरवणुकीदरम्यान वाहतुकीची कोंडी होऊ नये, तसेच गणेशभक्तांना कोणतीही अडचण निर्माण होऊ नये यासाठी पोलिसांकडून आवश्यक उपाययोजना करण्यात आल्या. प्रमुख चौकांमध्ये पोलिसांची उपस्थिती ठेवण्यात आली होती. जिल्हा अप्पर पोलीस अधीक्षक प्रेरणा कट्टे, सहाय्यक पोलीस अधीक्षक प्रशांत डगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी बंदोबस्ताची जबाबदारी सांभाळली.
——————
चौकट : ( नगरपालिका प्रशासनाकडून मूर्ती संकलनाची व्यवस्था )
पर्यावरणपूरक पद्धतीने गणेशमूर्तींचे विसर्जन व्हावे यासाठी नगरपालिका प्रशासनाने शहरात विविध ठिकाणी मूर्ती संकलन केंद्रांची व्यवस्था केली होती. शहरात दहा ठिकाणी मूर्ती संकलन केंद्रे उभारण्यात आली होती. अनेक गणेशभक्तांनी या केंद्रांवर गणेशमूर्ती दान करून प्रशासनाच्या पर्यावरणपूरक उपक्रमाला प्रतिसाद दिला.
याशिवाय काही गणेश मंडळे व भाविकांनी चंद्रभागा वाळवंटातील हौदामध्ये तसेच उपनगरातील नागरिकांनी येथील यमाई तलावा मध्ये  गणेशमूर्तींचे विसर्जन केले. विसर्जनाच्या ठिकाणीही भाविकांची मोठी गर्दी झाली होती.
——————-
चौकट : ( भक्तिमय वातावरणात उत्सवाची सांगता )
गेल्या बारा दिवसांपासून घराघरांत आणि सार्वजनिक गणेश मंडळांमध्ये सुरू असलेल्या गणेशोत्सवाची अनंत चतुर्दशीच्या दिवशी भावपूर्ण वातावरणात सांगता झाली. गणरायाच्या आगमनापासून ते विसर्जनापर्यंत विविध धार्मिक, सांस्कृतिक आणि सामाजिक कार्यक्रमांनी शहरातील वातावरण उत्साहाने भारून गेले होते. गणरायाला निरोप देताना अनेकांच्या डोळ्यांत अश्रू होते, तर ‘पुढच्या वर्षी लवकर या’च्या जयघोषाने वातावरण भावूक झाले होते. भक्तांनी विघ्नहर्त्या गणरायाकडे सुख, समृद्धी, आरोग्य आणि सर्वांच्या कल्याणाची प्रार्थना करीत पावसाळ्याच्या हंगामातील उरलेल्या दिवसांमध्ये तरी मोठा पाऊस येवून दुष्काळाचे सावट दूर होवू दे अशी प्रार्थना करीत  पुढील वर्षी लवकर आगमनाचे निमंत्रण दिले.
Post Views: 10
Previous Post

पारधी बांधवांची शिस्तबद्ध गणेश विसर्जन मिरवणूक; पारंपरिक वेशभूषेतील आदिवासी नृत्य ठरले विशेष आकर्षण

Next Post

विसर्जन दिवशी ५७ हजार ५०३ गणेशमूर्तींचे संकलन

तरुण भारत

तरुण भारत

Next Post
विसर्जन दिवशी ५७ हजार ५०३ गणेशमूर्तींचे संकलन

विसर्जन दिवशी ५७ हजार ५०३ गणेशमूर्तींचे संकलन

ताज्या बातम्या

सह्याद्रीच्या डॉ.माळी, डॉ.पाटील यांच्या पुस्तकाचे प्रकाशन

September 26, 2026

श्री विठ्ठल कारखान्याची ५१ वी वार्षिक सर्वसाधारण सभा, ४५ वा बॉयलर अग्निप्रदीपन समारंभ व मोळी पुजन

September 26, 2026

सोलापूरच्या मातीतच साहित्य समृध्दीची परंपरा – संमेलनाध्यक्ष रविंद्र गुर्जर

September 26, 2026
१२ दिवस चाललेल्या या गणेश उत्सवांमध्ये वृक्षारोपण समाज प्रबोधन पर देखावा

१२ दिवस चाललेल्या या गणेश उत्सवांमध्ये वृक्षारोपण समाज प्रबोधन पर देखावा

September 26, 2026

सिंहगडच्या लेझीम पथकाने वेधले लक्ष; पारंपरिक खेळाने गणेश विसर्जन मिरवणुकीत भरला रंग

September 26, 2026

परीक्षा शुल्क माफीचा निर्णय स्वागतार्ह; दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांना दिलासा

September 26, 2026
ज्योतिर्लिंग स्पोर्ट्स क्लब, बार्शीचा खेळाडू यशराज रोडे याची वुशू राज्यस्तरीय शालेय स्पर्धेसाठी निवड

ज्योतिर्लिंग स्पोर्ट्स क्लब, बार्शीचा खेळाडू यशराज रोडे याची वुशू राज्यस्तरीय शालेय स्पर्धेसाठी निवड

September 26, 2026

बार्शीत रंगणार बुद्धिबळाचा महासंग्राम; ४ ऑक्टोबरला ‘श्री माऊली चषक’ खुल्या राज्यस्तरीय बुद्धिबळ स्पर्धा

September 26, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

1261917

वृत्त संग्रह

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!