बार्शी – अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेच्या वतीने आयोजित विसावे अखिल भारतीय महात्मा फुले प्रबोधन मराठी साहित्य संमेलन बार्शी येथील डॉ. कर्मवीर मामासाहेब जगदाळे साहित्नगरीत २२ नोव्हेंबर रोजी उत्साहात झाले. या संमेलनात श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ, गौडगावचे अध्यक्ष विनायकराव गरड यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. यावेळी संमेलनाध्यक्ष फुलचंद नागटिळक, स्वागताध्यक्ष डॉ. बी. वाय. यादव, डॉ. शरद गोरे, जयकुमार शितोळे आणि संस्थेचे सचिव प्राचार्य पंडितराव लोहोकरे उपस्थित होते. या सन्मानामुळे संस्थेच्या शैक्षणिक व सामाजिक कार्याचा गौरव झाल्याची भावना व्यक्त करण्यात आली.
Views: 11