श्रीपूर – येथिल चंद्रशेखर विद्यालयाचे माजी शिक्षक माधव साठे यांना सापडलेले मंगळसुत्र त्यांनी परत करत आदर्श शिक्षकाचे मूर्तीमंद उदाहरण समाजा समोर ठेवल्याने त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे . ऐन दिपावली पाडव्या दिवशी . वैशाली कैलास काटकर यांचे मंगळसुत्र दुरुस्ती साठे त्यांचे पति कैलास सोनाराचे दुकानात घेवून जात असताना जात जात मारुतीरायाचे दर्शन घेवून जावे या उद्देशाने ते मंदीरात गेले व दक्षिणा टाकून दर्शन घेवून ते बाहेर पडले .
परंतू दुकानात जाताना मंगळसुत्र खिशात नसलेचे त्यांचे निदर्शनास आले . बरीच शोधा शोध केली परंतू मंगळसुत्र सापडले नाही .
दरम्यान नित्य नियमा प्रमाणे माधव साठे हे दर्शनासाठी मंदीरातअसता त्यांना ते सापडले यावर मंदीराचे पुजारी तुकाराम सुमंत यांना याची कल्पना दिली परंतू त्यांनीही कोणाचे पडले माहीत नसल्याचे सांगितले . यावर माधव साठे यांचे अस्वस्थ मन स्वस्थ होईना त्यांनी शेजारी राहत असलेले अरुण मार्डीकर यांचे ते गोष्ट कानी घालत मंदीराचे पुजारी सुमंत यांना फलकावर मंगळसुत्र सापडले असून ओळख पटवून घेवून जावे असे लिहणेस सांगितले .
दर्शनासाठी महेश घोडके आले असता त्यांनी तो बोर्ड लिहीलेला पाहीला . व त्यांचे मित्र असलेले कैलास काटकर यांना बोलता बोलता ही गोष्ट सांगितली त्यावर त्यांनी माझे कडूनच ते पडले असल्याचे सांगितले . यावर माधव साठे यांचेशी संपर्क करून त्यांनी सापडलेले सुमारे ७० हजार रु . चे मंगळसुत्र कैलास यांची पत्नी वैशाली काटकर यांचे कडे मारुती मंदीरातच परत केले . या वेळी मुलगी सानिका काटकर , कल्पना जयंत कुलकर्णी , जयंत कुलकर्णी , शंकर लोंढे , रमेश पवार , जाधव , श्रीरंग जगताप , नंदकुमार कुलकर्णी, पाटील , भरत बाबर , नागणे उपस्थित होते .
हरवलेले मंगळसुत्र परत मिळत असल्याचे समाधान त्यांचे चेहऱ्यावर दिसून येत होते .
Views: 12