श्रीपर – नेवरे ता. माळशिरस येथे वैशाख शुद्ध ३ रविवार दि . १९ एप्रील ते वैशाख शुद्ध १० रविवार दि . २६ एप्रील २०२६ या कालावधी मध्ये श्रीगुरु विठ्ठल महाराज देहूकर फड यांचे आशिर्वादाने तसेच बापूसाहेब महाराज देहूकर यांचे मार्गदर्शनाखाली अक्षय्य तृतीयेच्या शुभ मुहुर्तावर नेवरे व कोंठरपट्टा (ता . माळशिरस ) ग्रामस्थांच्या वतीने संतश्रेष्ठ तुकाराम महाराज गाथा भजन व अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे .
यामध्ये रविवार दि . १९ रोजी श्रीराम अभंग (वडापुरी ) , सोमवार दि . २० रोजी जगन्नाथ देशमुख (पंढरपूर ) मंगळवार दि . २१ रोजी अनिरुद्ध निंबाळकर (बिटरगाव ) बुधवार दि . २२ रोजी श्रीगुरु पुंडलिक देहूकर (श्रीक्षेत्र देहू ) गुरुवार दि . २३ रोजी अनिल पाटील (बार्शी ) शुकवार दि २४ रोजी गोविंद भोसले (नेवरे ) शनिवार दि . २५ रोजी ज्ञानेश्वर कदम (आळंदी देवाची ) यांची किर्तन सेवा होणार असून रविवार दि . २६ रोजी सोहम देहुकर मळोली यांचे काल्याचे किर्तन व महाप्रसादाने सोहळ्याची सांगता होणार आहे .
तसेच भिवाजी झुरळे ,ज्ञानेश्वर सुमंत (श्रीपुर ), शंकर गोसावी (नेमतवाडी ), हनुमंत जाधव (जाधववाडी ), श्रीहरी साळुंखे (खेळ भाळवणी ) , दादासाहेब गिरीगोसावी (महाळुंग ) दौलत गायकवाड (उंबरे वेळापूर ) यांची प्रवचन सेवा होणार आहे . याबरोबरच पहाटे ४ ते ६ काकडा भजन , स. ८ ते दु १२ गाथा भजन , दु . ४ ते ५ प्रवचन , दु . ५ ते ६ हरीपाठ , सायं . ७ ते ९ हरी किर्तन व हरी जागर असे धार्मिक कार्यक्रम होणार आहेत .
व्यासपीठ चालक म्हणून गोविंद भोसले , अंगत सांगवे (बिटरगाव ) हे सेवा बजावणार आहेत . संपर्कासाठी सुनिल भोसले ( ९८३४८२६६३३ ) गोविंद भोसले ( ८३०८२३२९८४ ) , आण्णा बोबडे ( ९९२१८९४९५८ ) .


















