सोलापूर – येथील सेशन्स कोर्टातील सरकारी अभियोक्ता अल्पना गिरीष कुलकर्णी या २६ वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर निवृत्त झाल्या. त्यानिमित्त त्यांचा निरोप समारंभ व सत्कार करण्यात आला. सहाय्यक संचालक तथा सरकारी अभियोक्ता विकास देशपांडे हे समारंभाच्या अध्यक्षस्थानी होते.
सौ. कुलकर्णी यांची सन २००० मध्ये सरकारी अभियोक्ता म्हणून नेमणूक झाली होती. मंगळवेढा, इंदापूर, जत, सोलापूर, बारामती येथे त्यांनी सरकारी वकील म्हणून काम पाहिले. सन २०२१ मध्ये त्यांची अतिरिक्त सरकारी अभियोक्ता म्हणून पदोन्नती झाली. सोलापूर पोलिस आयुक्तांलयाकडून सन २०१८ व २०१९ असा दोनवेळा रणरागिणी पुरस्कार देऊन सौ. कुलकर्णी यांचा गौरव केला होता. अनेक गंभीर गुन्ह्याचे खटले यशस्वीरित्या लढवून गुन्हेगारांना शासन करण्यासाठी सौ कुलकर्णी यांनी प्रयत्नांची पराकाष्ठा केली आहे.
सौ कुलकर्णी यांच्या निरोप समारंभ प्रसंगीच्या सत्कार समारंभात सहाय्यक संचालक व सरकारी अभियोक्ता विकास देशपांडे, ज्येष्ठ विधीज्ञ धनंजय माने, महाराष्ट्र आणि गोवा बार असोसिएशनचे ॲड. मिलींद थोबडे, सरकारी वकील प्रदीपसिंह रजपूत, गिरीष कुलकर्णी, गौरव कुलकर्णी, मानसी कुलकर्णी यांच्यासह अनेक मान्यवरांनी समयोचित भाषण करत सौ. कुलकर्णी यांच्या कारकिर्दीबद्दल गौरवोद्गार काढले.
याप्रसंगी ॲड. शशी कुलकर्णी, ॲड. विद्यावंत पांढरे, ॲड. अजमोद्दीन शेख, सरकारी वकील सार्थक चिवरी, संतोष पाटील, तुषार निमन यांच्यासह अनेक वकील आणि हितचिंतक उपस्थित होते. सरकारी वकील श्रीमती पल्लवी भोळा यांनी सूत्रसंचालन केले.
अल्पना कुलकर्णी यांच्या सत्कार प्रसंगी विधीज्ञ धनंजय माने , मिलिंद थोबडे, गिरीश कुलकर्णी, विजय देशपांडे, प्रदीपसिंह राजपूत
























