सदाशिवनगर – पालखी मुक्कामाच्या नजीक पालखी मार्गावरील झाडे अज्ञाताने पेटवलेल्या कचऱ्यामुळे १ कि मी अंतरावरील झाडे होरपळून गेली असून याबाबत नगर पंचायतीला माहिती मिळताच मुख्याधिकारी सुमित जाधव यांनी त्या झाडांना तंकरणे पाणी घालण्याच्या सूचना दिल्या त्यानुसार या झाडांना रात्री पाणी देण्यात आले.
माळशिरस शहरालगत श्री संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा मुक्कामी असतो .या पालखी मार्गावर काही वर्षापूर्वी झाडे लावण्यात आली आहेत हि झाडे मोठी झाली आहेत.अज्ञाताने कचरा पेटवला झाडाखाली वाळला पाला पाचोळा असल्याने उन्हाच्या तडाख्यात हि आग सर्वत्र पसरून बाजार तळापासून पालखी मैदानापर्यंत गेली .या रस्त्वाच्या कडेला लावलेली झाडे होरपळून गेली आहेत.सदरची बाब नगरपंचायतीचे मुख्याधिकारी सुमित जाधव यांना समजताच त्यांनी या झाडांना तत्काळ पाणी देण्याच्या सूचना दिल्या त्यानुसार पाणी पुरवठा विभागाचे मदने यांनी तात्काळ तंकरणे झाडांना पाणी दिले असून सलग तीन चार दिवस या झाडांना पाणी सोडणार असल्याचे सांगितले
आवटे वनक्षेत्रपाल ,माळशिरस
झाडे मोठी असल्यामुळे या झाडांना पाणी दिल्यास पुन्हा पालवी फुटू शकते हि जळून जाणार नाहीत .परंतु तीन चार वेळा पाणी देणे आवशक आहे.

























