सोलापूर – शिवालय प्राथमिक माध्यमिक आश्रम शाळा आणि ओम वैष्णव कनिष्ठ महाविद्यालय तळेहिप्पारगा येथे आषाढी वारी निमित्त दिंडी व रिंगण सोहळा बाल वारकऱ्यांच्या बोला पुंडलिकवरदेव हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय! या जयघोषात मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
श्री विठ्ठल रुक्मिणी आणि विविध संतांच्या वेशभूषे दाखल झालेल्या बालकांचे संतपूजन आणि पालखीचे पूजन दिंडी सोहळ्यास उपस्थित असलेल्या ह भ प शाम जोशी महाराज, संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री दत्तात्रय गणेशकर साहेब आश्रमशाळांच्या मुख्याध्यापिका प्राचार्या सौ कांचन वाघचवरे यांच्या हस्ते व ह. भ. प. खराडे महाराज, अभयकुमार सरवळे, या सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत झाले. याप्रसंगी आश्वाचे पूजन प्राचार्या सौ कांचन वाघचवरे यांच्या हस्ते करण्यात आले.
विद्यार्थ्यांनी विविध अभंगाचे गायन मोठ्या भक्ती भावाने केले. विद्यार्थ्यांच्या आणि आश्वाच्या रिंगण सोहळ्याने या दिंडी मध्ये वाखरीच्या रिंगण सोहळ्याची आठवण करून देण्यात आली. या मुला मुलींनी विविध प्रकारच्या फुगड्या खेळून दिंडी सांगता केली.
सदरच्या दिंडी व रिंगण सोहळास शाळेचे सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी गावातील पालक गावकरी बहुसंख्येने उपस्थित होते उपस्थित सर्व विद्यार्थ्यांना व पालक यांना महाप्रसाद वाटप करण्यात आले
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजकुमार शिंदे यांनी केले तर आभार सिध्दरूढ रेऊरे यांनी मानले.




















