सोलापूर – नूमवि शिशु शाळेमध्ये हिरक महोत्सव वर्षानिमित्त Happy Thoughts Workshop चे आयोजन करण्यात आले होते.
संस्था गीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली.
यावेळी प्रमुख पाहुणे व मार्गदर्शक म्हणून हॅपी थॉट्सचे मा. श्री. अरविंद भंडे हे लाभले होते.
नूमवि शिशु शाळेच्या मुख्याध्यापिका मु. सौ. अर्चना कुलकर्णी यांनी प्रास्ताविक केले. त्यांच्या प्रास्ताविकातून त्यांनी मुलांचा सर्वांगीण विकास व काळानुरूप होणारा बदल शिक्षकांनी कसा स्वीकारावा याविषयी विचार मांडले.
त्यानंतर मार्गदर्शक मा. अरविंद भंडे सरांनी How to become a best teacher या विषयावर शिक्षकांना मोलाचे मार्गदर्शन केले. यावेळी त्यांनी सकारात्मक विचारसरणी हीच यशाची गुरुकिल्ली असून आनंदी विचारांमधूनच विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण होतो असे सांगितले. तसेच शिक्षकांनी स्वतः आनंदी राहून विद्यार्थ्यांमध्ये आनंद पेरावा असा मौलिक संदेश त्यांनी दिला.
यावेळी शाळा समिती सदस्य मा. सुरेशबाबू मंकणी, मुख्याध्यापिका सौ. अर्चना कुलकर्णी, सौ. स्मिता माळवदकर, सौ. श्रुती बागेवाडी, सौ. आकांक्षा आराध्ये, सौ. संगीता कोळी , ओम प्रकाश अष्टणकर आदी मान्यवर उपस्थित होते. तसेच विविध संस्थांमधील शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी माननीय मुख्याध्यापिका अर्चना कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली सांस्कृतिक प्रमुख अलका ओक, मृणाल देशपांडे, स्नेहा गजेंद्रगडकर, सारिका कुलकर्णी, सर्व शिक्षिका व शिक्षकेतर वृंद यांनी परिश्रम घेतले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार रंजना काळे यांनी मानले.
————
Post Views: 9