बार्शी – शिक्षण क्षेत्रात आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर वाढावा आणि बदलत्या डिजिटल युगात शिक्षकांना कृत्रिम बुद्धिमत्ता (Artificial Intelligence–AI) या अत्याधुनिक तंत्रज्ञानाची ओळख होऊन त्याचा शैक्षणिक क्षेत्रात प्रभावी वापर करता यावा, या उद्देशाने रोटरी क्लब ऑफ बार्शी, पंचायत समिती बार्शी आणि नगरपालिका शिक्षण मंडळ, बार्शी यांच्या सहकार्याने तसेच प्राईम कॉम्प्युटर्स, बार्शी यांच्या संयुक्त सहभागातून बार्शी तालुक्यातील शिक्षकांसाठी विशेष AI प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.
दि. १८ ते २१ ऑगस्ट या कालावधीत आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमाला बार्शी तालुक्यातील जिल्हा परिषद, नगरपालिका, खासगी व्यवस्थापनाच्या प्राथमिक व माध्यमिक शाळांमधील शिक्षकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
प्रशिक्षणादरम्यान AI च्या माध्यमातून अध्यापन अधिक प्रभावी, नाविन्यपूर्ण व विद्यार्थी-केंद्रित कसे करता येईल, पाठयोजना व शैक्षणिक साहित्याची निर्मिती, विद्यार्थ्यांसाठी अध्ययन सामग्री तयार करणे, दैनंदिन शैक्षणिक कामकाज अधिक सुलभ करणे यासह AI च्या विविध उपयोगांबाबत प्रत्यक्ष प्रात्यक्षिकांसह मार्गदर्शन करण्यात आले.
या उपक्रमामागील संकल्पना व नियोजनामध्ये रोटरी क्लब ऑफ बार्शीचे अध्यक्ष रो. नवनाथ गुल्हाने आणि सचिव रो. विशाल देशमुख यांनी विशेष पुढाकार घेतला. शिक्षकांना आधुनिक तंत्रज्ञानाने सक्षम करुन त्याचा थेट लाभ विद्यार्थ्यांच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी व्हावा, या व्यापक उद्देशाने हा अभिनव उपक्रम राबविण्यात आला.
“शिक्षक आधुनिक तंत्रज्ञानाने सक्षम झाले, तर विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला नवी दिशा मिळेल,” या विचारातून रोटरी क्लब ऑफ बार्शीने शिक्षण क्षेत्रासाठी घेतलेला हा उपक्रम निश्चितच महत्त्वपूर्ण ठरला.
या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी रो. मधुकर डोईफोडे, रो. आनंद बेडमुथा, रो. गोविंद बाफना, रो. प्रमोद काळे, रो. विजयलक्ष्मी पाटील, रो. प्रदीप बागमार, रो. संजय हिंगमिरे, रो. राज खुणे आणि रो. सोमनाथ गुल्हाने या रोटरी सदस्यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
पंचायत समिती बार्शी, नगरपालिका शिक्षण मंडळ बार्शी, प्राईम कॉम्प्युटर्स तसेच सहभागी सर्व शिक्षकांच्या सहकार्यामुळे हा उपक्रम उत्साहपूर्ण वातावरणात यशस्वीरीत्या संपन्न झाला.
Post Views: 33