कुर्डूवाडी – 28 डिसेंबर 2025 रोजी पार पडलेल्या राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती परीक्षेत,सोजरताई बहुउद्देशीय विकास मंडळ निमगाव टे. संचलित कै. विठ्ठलरावजी शिंदे प्रशाला अंबाडा,या विद्यालयातून 15 विद्यार्थी परीक्षेसाठी समाविष्ट झाले होते. त्यापैकी 12 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून प्रशालेचा निकाल 80% एवढा लागला.
दिनांक 24 एप्रिल 2026 रोजी राष्ट्रीय स्तरावरील गुणवत्ता यादी जाहीर झाली असून त्यामध्ये मागास वर्गातून(Sc)कु. श्रुती लालचंद सरवदे हिने 143 गुण मिळवून जिल्ह्यात पहिला क्रमांक पटकावला तसेच भटक्या विमुक्त प्रवर्गातून (NT C) कु. उत्कर्षा उमेश सरक हिने 130 गुण मिळवून जिल्ह्यात 9 वा.क्रमांक पटकावला तर इतर मागास प्रवर्गातून (OBC) कु.आरती सचिन टोणपे हिने 123 गुण (ज़िल्ह्यात 67वी) मिळवले.या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना केंद्राकडून 48000 रुपये शिष्यवृत्ती मिळणार आहे. या विद्यार्थ्यांना ननवरे ए. एच. , हुलगे बी एस. तांबोळी एफ जे. आणि , चव्हाण डी एल. यांचे मार्गदर्शन लाभले. सर्व यशस्वी विद्यार्थी व त्यांना मार्गदर्शन करणारे शिक्षक यांचे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मा.आ. संजय मामा शिंदे तसेच संस्थेचे सचिव प्राचार्य ठोंबरे आर. ए. विद्यालयाचे प्राचार्य श्री. रजपूत जे.एन.माध्यमिक विभागाचे प्रमुख श्री. पाटील एम. एस.उच्च माध्यमिक विभागाचे प्रमुख श्री घाडगे व्ही. एन.,यशवंत प्रायमरी स्कूल अंबाडचे प्राचार्य होनमोटे एस.आर.यांनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.


























