सोलापूर : केंद्र शासनाच्या सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालयाच्या उद्योगवर्धिनीतर्फे सेवापाथेय उपक्रमाअंतर्गत राबविण्यात येणाऱ्या शिलाई आणि अरिवर्क प्रशिक्षण शिबिराचे उद्घाटन मॉडर्न हायस्कूल येथे करण्यात आले.
याप्रसंगी व्यासपीठावर उद्योगवर्धिनीच्या संस्थापक अध्यक्षा चंद्रिका चौहान, कल्पना कुलकर्णी, रागिणी कुलकर्णी, अनुपमा हिराळकर, मुख्याध्यापिका शिल्पा जोशी उपस्थित होते. प्रारंभी भारतमातेच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
या शिबिरात मॉडर्न हायस्कूलमधील विद्यार्थिनींच्या माता पालकांना ब्लाऊज शिवणे, अरिवर्क प्रशिक्षण देण्यात येणार आहे. ३० दिवसांचे हे शिबिर असून यात महिलांना विविध कौशल्ये शिकविण्यात येणार आहेत.
याप्रसंगी तेजस्वी प्लास्टिकचे व्यवस्थापकीय संचालक प्रसाद हिराळकर आणि आदिती हिराळकर यांनी सीएसआर निधी चंद्रिका चौहान यांच्याकडे सुपूर्द केला.
उद्योगवर्धिनीच्या संचालिका ऍड. गीतांजली चौहान यांनी प्रास्ताविक केले. कीर्ती कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन तर सेवापाथेय प्रमुख स्मिता लाहोटी यांनी आभार प्रदर्शन केले.
यावेळी खजिनदार वर्षा विभूते, संचालिका मृणालिनी भूमकर, राजेश्वरी भूमकर, मीनाक्षी सलगर, धीरेन गडा, आशिष छाजेड, राजूभाई वोरा, ज्ञानेश्वर जाधव, चन्नवीर बंकुर, राघवेंद्र ग्यानबोटे, शिक्षिका कल्पना गोली, सहशिक्षिका लक्ष्मी उंब्रजकर, कविता वायलाल आदी उपस्थित होते.
———
उद्योगवर्धिनीतर्फे घेण्यात आलेल्या बॅग तयार करण्याच्या पहिल्या प्रशिक्षण शिबिरात प्रशिक्षण घेऊन कौशल्यप्राप्त केलेल्या रुची क्षीरसागर या होतकरू प्रशिक्षणार्थीला उद्योजक सतीश मालू यांच्या वाढदिवसानिमित्त शिलाई मशीन भेट देण्यात आली.

















