सोलापूर : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 व्या जयंतीनिमित्त विवेक विचार मंच आणि भीम प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमानाने चित्रकला आणि निबंध स्पर्धाचे आयोजन सम्राट चौक येथील कर्मवीर भाऊराव पाटील रयत शिक्षण अंतर्गत रावजी सखाराम हायस्कूल येथे घेण्यात आली. त्यास चांगला प्रतिसाद मिळाला.
याप्रसंगी विवेक विचार मंचच्या जिल्हा संयोजिका आश्विनी चव्हाण, कार्यक्रम प्रमुख प्रीती उडाणशिव , भीम प्रतिष्ठानचे संस्थापक दलितमित्र बाबा बाबरे , सचिव अकबर शेख, यश उडानशिव, शहर संयोजक सिद्धांत बाबरे आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी अमोल अंधारे, साजेदा बागवान, अण्णा दीक्षित, गजानन गोरे, अजहर शेख, अण्णासाहेब काकडे, प्रतिभा भोसले, महावीर आळंदकर , सुनिता पाटील आदी शिक्षक व पदाधिकाऱ्यांचे सहकार्य लाभले. प्राचार्य भारत केत यांनी मार्गदर्शन केले. सूत्रसंचालन वंदना डांगे तर आभार प्रदर्शन रमेश वडवराव यांनी मानले.

















