पिलीव – माळशिरस तालुक्यासह पिलीव परिसरातील कृषी विक्रेते आपल्या विविध मागणयांसाठी आजपासून बेमुदत संपावर गेले आहेत.विविध मागण्यांमध्ये खत कंपन्यांकडून होणारे लिकींग बंद करणेबाबत, घेतलेले सॅम्पल व यानंतर घेणाऱ्या सॅम्पलचे पैसे मिळणेबात, कीटकनाशके व खतांची अन अधिकृत एजंटामार्फत होणारी विक्री थांबवावी, ऑनलाईन किंवा ॲपदवारे बियाणे विक्री अनिवार्य करण्यास विरोध, खत विक्रेत्यांवर शासनाने लादलेले जाचक नियम ताबडतोब रद्द करावेत, अन अधिकृतपणे बिटी/ एचटी बियाणांच्या विक्रीवर ताबडतोब बंदी आणावी, नवीन बियाणे व कीटकनाशके कायद्यातील अन्यायकारक तरतुदी ताबडतोब रद्द कराव्यात, दुकानदाराकडून होणाऱ्या किरकोळ चुकांवर कडक कारवाई थांबवावी यासह इतर मागण्यांसाठी कृषी विक्रेते आजपासून बेमुदत संपावर गेले आहेत .
यामुळे माञ ऐन उन्हाळ्यात शेतकऱ्यांना औषधे, खत, कीटकनाशके मिळत नसल्यामुळे अडचणींना सामोरे जावे लागत आहे .सोलापूर जिल्ह्य़ासह माळशिरस तालुक्यातील कृषी विक्रेते यांनी याबाबत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनाही निवेदन दिले आहे.यावर महाराष्ट्र शासन कधी तोडगा काढणार याकडे कृषी विक्रेते तसेच शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.
याबाबत पिलीव येथील उमेश कृषी केंद्राचे उमेश देशमुख यांना विचारले असता आमच्या या मागण्यांबाबत आम्ही शासनाकडे अनेकवेळा मागणी करूनही अनेक वर्षांपासून शासनाने आमची कसलीच दखल घेतली नाही यामुळे आम्ही आता बेमुदत संप करीत असुन शासन जोपर्यंत निर्णय घेत नाही तोपर्यंत आम्ही अजिबात माघार घेणार नाही _ उमेश देशमुख ,सचिव माळशिरस तालुका फर्टिलायझर असोसिएशन.
सध्या उन्हाळ्याचे दिवस सुरु आहेत शेतकऱ्यांना खते ,तणनाशके व इतर औषधांची सतत गरज आहे .पण दुकानदारांनी संप केल्यामुळे शेतकऱ्यांना अडचणीचा सामना करावा लागत आहे ._ राहुल झिंजे ,प्रगतीशील शेतकरी ,झिंजेवस्ती.



























