सोलापूर: येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्टेडियम (रेल्वे मैदान) वर सुरू असलेल्या ‘इंडियन मॉडेल पेरेंट्स क्रिकेट लीग’ (पर्व १६ वे) मध्ये रंगतदार सामने पाहायला मिळत आहेत. नुकत्याच झालेल्या सामन्यांमध्ये ‘आयएमएस रॉयल’ आणि ‘आयएमएस मॉडर्न’ या संघांनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांवर मात करत विजय संपादन केला.
सामना १: आयएमएस रॉयल वि. आयएमएस अल्फा
या सामन्यात ‘आयएमएस रॉयल’ संघाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले. फलंदाजीसाठी उतरलेल्या ‘आयएमएस अल्फा’ संघाला १२ षटकांत ७ बाद ७२ धावांपर्यंतच मजल मारता आली. ७३ धावांचे लक्ष गाठताना ‘आयएमएस रॉयल’ने ९.१ षटकांत ५ गड्यांच्या मोबदल्यात विजय मिळवला.
संक्षिप्त धावफलक:
आयएमएस अल्फा: १२ षटकांत ७ बाद ७२ धावा. (अक्रम मुजावर १७, मोईन शेख ०९, अनिल जाधव ०८. गोलंदाजी: बसवराज अडगळ २/०९, सचिन वांगीकर २/१४, महेश आरकाल १/१२).
आयएमएस रॉयल: ९.१ षटकांत ५ बाद ७३ धावा. (महेश आरकाल ३६, शरणप्पा पालोडी १७, सरफराज शेख १३. गोलंदाजी: मुक्तार शेख २/०९, अमर पांचवे १/११).
सामनावीर: महेश आरकाल (आयएमएस रॉयल)
सामना २: आयएमएस मॉडर्न वि. आयएमएस अंबर
दुसऱ्या सामन्यात ‘आयएमएस मॉडर्न’ संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. हाजी तांबोळीच्या ४० धावांच्या जोरावर मॉडर्न संघाने १२ षटकांत ८ बाद ११५ धावांचा डोंगर उभा केला. प्रत्युत्तरादाखल ‘आयएमएस अंबर’चा संघ १२ षटकांत ६ बाद ६७ धावाच करू शकला. आयएमएस मॉडर्नने हा सामना ४८ धावांच्या मोठ्या फरकाने जिंकला.
संक्षिप्त धावफलक:
आयएमएस मॉडर्न: १२ षटकांत ८ बाद ११५ धावा. (हाजी तांबोळी ४०, अब्दुल पीरजादे २५, सोनु केसवानी १२. गोलंदाजी: धवण एम. २/०९, विकास कदम २/२०).
आयएमएस अंबर: १२ षटकांत ६ बाद ६७ धावा. (राम कोंडले ३३, प्रशांत सुरवसे १२, अनिल पाटील १०. गोलंदाजी: कादिर सिपाही ४/०९, अहमद शेख ०/०४).
सामनावीर: कादिर सिपाही (आयएमएस मॉडर्न).


























